पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीतेच्या अध्यायांतील विषयांची श्लोकवार अनुक्रमणिका. टीप-गीतेच्या अध्यायांतील विषयांचे या अनुक्रमणिकेत श्लोकवार जे विभाग केले आहेत ते पुढे छापलेल्या मूळ संस्कृत श्लोकांमागे $$ अशी खूण घालून दाखविले आहेत; आणि भाषान्तरांत त्या त्या श्लोकापासून निराळा पारिग्राफ सुरू केला आहे.] अध्याय पहिला-अर्जुनविषादयोग. १. धृतराष्ट्राचा संजयास प्रश्न. २-११. दुर्योधनाचे द्रोणाचार्यांजवळ उभयपक्षांच्या सैन्याचे वर्णन. १२-१९. “युद्धारंभी परस्परांच्या सलामीचा शंखनाद. २०-२७. अर्जुनाचा रथ पुढे नेऊन सैन्यनिरीक्षण. २४-३७. दोन्ही सैन्यांत आपलेच बांधव, व त्यांना मारून कुलक्षय होणार, हे पाहून अर्जुनास झालेला विषाद. ३८-४४. कुलक्षयादि पातकांचे परिणाम ४५.४७. युद्ध न करण्याचा अर्जुनाचा निश्चय व धनुर्बाणत्याग. ध्याय दुसरा-सांख्ययोग. १-३, श्रीकृष्णांचे प्रोत्साहन. ४-१०, अर्जुनाचे उत्तर, कर्तव्य मूढता व धर्मनिण पार्थ श्रीकृष्णास शरण जाणे. ११-१३. आत्म्याचे अशोच्यत्व. १४, ६५. देव आगि सुखदुःख यांचे अनित्यत्व, १६-२५. सदसद्विवेक व आत्म्याच्या नित्यत्वादि स्वरूपकथनाने त्याच्या अशोच्यत्वाचे समर्थन. २६.२७. आत्म्याच्या अनित्यत्वपक्षी उत्तर. २८. सांख्यशास्त्राप्रमाणे व्यक्त भूतांचे अमितत्व व अशोच्यत्व. २९, ३०. आत्मा लोकांना दुज्ञेय खरा; पण तूं खरे ज्ञान प्राप्त करून घेऊन शोक सोड. ३१-३८. क्षात्रधर्माप्रमाणे