पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर घटीपा-अध्याय २. $ योनस्थः कुरु कर्माणि संगं त्यक्त्वा धनंजय । शकतो. तद्वत् वेदांचा जितका म्हणून उपयोग आहे तितका सर्व ज्ञानी पुरुषास त्याच्या ज्ञानाने होऊ शकतो-असा अर्थ घेतात. पण या अन्व. यांत पहिल्या श्लोकपंक्तीत तावान्' व दुसन्या पंक्तीत यावान् ' अशी दोन पर्दै अध्याहन घ्यावी लागत असल्यामुळे आम्ही हा अन्वय व अर्थ स्वीकारिला नाही. आमचा अन्वय व अर्थ कोणतेंहि पद अध्याहृत घेतल्यावांचून लागत असून त्यांत प्रतिपाद्य असलेले वेदांच्या नुसत्या (म्हणजे ज्ञानव्यतिरिक्त) कर्मकांडाचे गौणत्वच या ठिकाणी विवक्षित आहे, असें पूर्वीच्या श्लोकांवरून सिद्ध होते. परंतु ज्ञानी पुरुषास यज्ञ- यागादि कर्माची अपेक्षा नसत्ये, असे म्हटल्याने ज्ञानी पुरुषाने ही कमैं कर नयेत, अजीबात सोडून द्यावी असे यावरून कित्येक लोक जे अनुमान काढीत असतात ते मात्र गीतेस संमत नाही. कारण या कर्माचे फल जरी ज्ञानी पुरुषास नको असले तरी फलासाठी म्हणून न रहे, तर यज्ञयागादिक कम हे आपले शास्त्रविहित कर्तव्य आहे या दृष्टीने, कर्म त्याला कधीच सोडितां येत नाही. फलाशा नसली तरी • इता निष्काम कर्माप्रमाण यज्ञयागादि कमें सुद्धां निःसंगवुद्धीने झान्याने केलीच पाहिजेत असें अठराव्या अध्यायांत भगवंतांनी आपले निश्चित मत स्पष्ट सांगितले आहे (मार्गाल श्लोकावरील व गी. ६.१९ वरील आमची टीका पहा); अ.णि हाच निष्कामपर अर्थ आता पुढील श्लोकांत व्यक्त करून दाखवितात-- (म्हणून माझ्या कर्माच) अमुक फल मिळावे असा (हावरेपणाचा हेतु (मनांत) ठेवून काम करणारा होऊ नको; आणि कम न करण्याचाहि तूं आग्रह धरूं नको. [या श्लोकाचे चार चरण एकमेकांच्या अर्थाचे पूरक असुन त्यामुळे अतिव्याप्ति न होता कर्मयोगाचे सर्व रहस्य थोडक्यात सुंदर रीतीने देता आले आहे. किंबहुना हे चार चरण म्हणजे कर्मयोगार्च