पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर ब टीपा-अध्याय २. ४३ - - - - - - - - - - - . .. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। नाचे विशेषणहि व समजतां सति सप्तमि मानिली ह्मणजे “सर्वत:- संप्लुतोदके सति उदपाने यावानार्थः (न स्वल्पमपि प्रयोजनं विद्यते) तावान् विजानतः ब्राह्मणस्य सर्वेषु वेदेषु अर्थः" असा कोणतेंहि बाहे- रचे पद अध्पाहत न घेतां साल अन्बय लगून, त्याचा अर्थहि सरळ असा होतो की, " चोहोकडे पाणीच पाणी होऊन (कोठेही अनायासें पिण्यास मुबलक पाणी मिळू लागल्यावर) ज्याप्रमाणे विहिरीला कोणीच विचारीत नाही, त्याप्रमाणे ज्ञान प्राप्त झालेल्या पुरुषास यज्ञयागादि नुसत्या वैदिक कर्माचा कांहींच उपयोग नसतो" कारण वैदिक कर्म केवळ स्वर्ग: प्राप्तीसाठी नव्हे, तर अखेर मोक्षसाधक ज्ञानप्राप्ति होण्यासाठी कराव- याचे असते; आणि ही ज्ञानप्राप्ति या पुरुषास आधीच झाली असल्या- मुळे त्याला वैदिक कर्म करून नवे काही मिळवावयाचे शिल्लक राहि- लेले नसते. याच हेतूनें “जो ज्ञानी झाला त्याला या जगांत कर्तव्य उरलेले नसते;" असे पुढे तिच्या अध्यायांत (३. १७) म्हटले आहे. मोठ्या तलावावर किंवा नदीवर अनायासे हवे तेवढे निर्मल उदक पिण्याची सोय असतां विहिरी कडे कोण ढुंकून पहाण र ? अशा प्रसंगी कोणीहि विहिरीबी अपेक्षा ठेवीत नाही. सनत्सुजातीयांतील अखेरच्या । अध्यायांत (म. भा. उद्यो. ४.५.२६) हाच श्लोक थोड्या शब्दभेदाने आला असून त्यावरील माधवाचार्याच्या टीकत स्याचा अर्थ अम्हीं पर दिल्याप्रमाणेच केला आहे; आणि शुकानुप्रश्नांत ज्ञान व कर्म यांचे तार यम्यविवेचन चालू असता " न ते (ज्ञानिनः) कर्म प्रशंसंति कृपं नयां पिबभिव"-नदीवर ज्यास पाणी मिळते तो विहिरीची ज्याप्रमाणे प्रतिष्ठर ठेवीत नाही, त्याप्रमाणे 'ते' म्हणजे ज्ञानी पुरुष कर्माची मातब्बरी ठेवीत नाहीत असे साफ म्हटले आहे (म. भा. शां. २४०.१०), तसेंच पांडवगीतेतील सतराव्या श्लोकांत वासुदेवाला सोडून जो दुसऱ्या देवाची उपासना करितो तो-“तृपितो जावीतीरे कूपं दांच्छति दूर्मतिः"- - - - -