पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

. - - - गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय २. यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके । योगक्षेम संपादन करणारी कम सोडून देऊन आपले चित्त यापलीकडल्या परब्रह्माकडे लाविले पाहिजे हे उघड आहे; आणि याच अर्थी निद्व व नियोगक्षेम हे शब्द वर आले आहेत. वैदिक कर्मकांडांतील ही काम्य कमैं सोडिली तर योगक्षेम कसा चालेल अशी या ठिकाणी शंका येण्या- सारखी आहे (गी र. पृ. २९० व ३८२ पहा). पण त्याचे उत्तर येथे न देता हा विषय पुढें पुनः नवव्या अध्यायांत आला आहे तेथं हा योगक्षेम भगवान् चालवितात असे म्हटले आहे; व या दोनच ठिकाणी गतिन योगक्षेम' हा शब्द आलेला आहे (गी. ९, २२ व त्यावरील आमची टीप पहा). नित्यसत्वस्थ या पदाचाच अर्थ त्रिगुणातीत असा होतो. कारण सत्वगुणाच्या नित्योत्कर्षानेच पुढे निगुणातीतावस्था प्राप्त होत असून तीच खरी सिद्वावस्था होय असे पुढे सांगितले आहे (गी. १४.१४ व २०, गी. र. पृ. १६४ व १६५ पहा). तात्पर्य, मीमांस. पांची योगक्षेमकारक त्रिगुणात्मक बाम्ब कमें साइन देऊन व सुख- दुःखाच्या द्वंद्वांतून पार पडून ब्रह्मनिष्ट किंवा आरमनिष्ट होण्याबद्दल येथें उपदेश केला आहे. पण आत्मनिष्ठ हो म्हणजे ही सर्व कर्म स्वरूपतः अजीबात सोटून दे असाहि अर्थ समजावयाचा नाही, हेहि पुन: लक्षांत ठेविले पाहिजे. वरील श्लोकांत वैदिक काम्य कर्माची जी निंदा केली आहे किंवा कमीपणा दाखविला आहे तो कर्माचा नव्हे तर त्यांतील काम्य बुद्धीचा आहे ही काम्य बुद्धि मनांत नसेल तर नुस्ते यज्ञयाग कोणत्याहि प्रकारे मोक्षास प्रतिबंधक होत नाहीत. (गी. र.पू. २८१- २९२). म्हणून मीमासकांची हीच यज्ञयागादि कमै फलाशा व संग सोडून चित्तशुद्धयर्थ व लोकसंग्रहार्थ अवश्य केली पाहिजेत असें भगवं. तांनी आपले निश्चित व उत्तम मत पुढे अठराव्या अध्यायाच्या आरंभी सांगितले आहे (गी. १८.६), गीताल दोन ठिकाणी ही विधाने - - - - - - - - - -. ..- - - -