पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. $$ एषा तेऽभिहिता सांख्ये बुद्धिोंगे न्यिमां शृणु । बुद्धया युक्तो यया पार्थ कर्मबंधं प्रहास्यसि ॥ ३९ ॥ अर्जुन लढाई सोडून भिक्षा मागण्यास तयार झाला होता त्या संन्यास- मागांतील तत्वज्ञानाप्रमाणे आत्म्याचा किंवा देहाचा शोक करणे उचित नाही. सुखदुःखें समबुद्धीने सोसली पाहिजेत आणि स्वधमाकडे लक्ष देऊन क्षत्रियाने यद्ध करणेच योग्य व हे युद्ध समबुद्धीन केले असता कोणतेंहि पाप लागत नाही, असे भगवंतांनी अर्जुनास सिद्ध करून दाखविले. तथापि केव्हां ही झाले तरी संसार सोडून संन्यास घेणे हेच प्रत्येकाचे या जगांत परम कर्तव्य असे या मार्गाचे मत असल्यामुळे, इष्ट वाटल्यास आतांच युद्ध सोडून संन्यास कांघेऊं नये, किंवा स्वधर्म तरी का पाळवा, इ. शंकांचे सांख्यज्ञानाने निवारण होत नाहीं; व त्यामुळे अर्जुनाचा मूळ आक्षेप कायम रहातो, असे म्हटले तरी चालेल. म्हणून भगवान् आतां असें सागतात की-] (३९) सांख्य म्हणजे संन्यासनिष्ठे प्रमाणे तुला ही बुद्धि म्हणजे ज्ञाम किंवा उपपत्ति सांगितली. आता ज्या बुद्धीने युक्त झालास म्हणजे (कर्मे न सोडिताहि) हे पार्थी ! तूं कर्मबंध सोदशील अशी ही ( कर्मः) योगांतील बुद्धि म्हणजे ज्ञान (तुला सांगतों) ऐक. [भगवद्गीतेचे रहस्थ समजण्यास हा श्लोक अत्यंत महत्वाचा आहे. सांख्य शब्दाने कापिल सांख्य किंवा नुस्ता वेदान्त, व योग शब्दाने पातंजल योग, हे अर्थ या ठिकाणी उद्दिष्ट नसून सांख्य म्ह. संन्यासमार्ग आणि योग म्ह० कर्ममार्ग हेच अर्ध या ठिकाणी वेतले पाहिजेत, असें गीता ३.३ या श्लोकावरून उघड होते. हे दोन्ही मार्ग स्वतंत्र असून त्यांच्या अनुयायांसहि अनुक्रमें 'सांख्य'संन्यासमार्गी, आणि 'योग'कर्मयोग, मागी असे म्हणतात (गी, ५.५) पैकी साम्यनिष्ठेतील लोक केव्हांना केव्हा तरी अखेर कमें अजीबात सोडून देणच श्रेष्ठ मानीत असल्यामुळे - - - - - - - -- - - - - - - - - -