पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/३६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीता, भाषान्तर व टीपा-अध्याय १८. ५। • - -- - - - - - - - -.'-.. - - $$ सर्वगुह्यतमं भूयः शृणु मे परमं वचः।। इष्टोऽसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितम् ॥ ६४ ।। तीच्या वळणावर जातात, तेथें निग्रह चालत नाही" (गी ३.३३) असें भगवंतांनी तिसन्याच अध्यायांत सांगितलं आहे. अशा वेळी कमांच्या ठायीं आसक्ति ठेवू नका, यापलीकडे मोक्षशास्त्र किंवा नीति- शास्त्र जास्त काही सांगू शकत नाही, अध्यात्मदृष्ट्या हा विचार झाला. परंतु भक्तिदृष्टया प्रकृति तरी ईश्वराचाच अंश होय. म्हणून हाच सिद्धान्त ६१ च ६२ या श्लोकांत ईश्वराकडे सर्व कर्तृत्व देऊन येथे सांगितला आहे. जगांत जे काही व्यवहार चालू आहेत ते परमेश्वर आपणास पाहिजे तसे करून घेत आहे. सबब अहंकारबुद्धि, सोडून शहाण्या पुरुषाने आपल्याला सर्वस्वी परमेश्वराच्याच हवाली करणे योग्य होय. १३ व्या श्लोकांत "तुझ्या इच्छस येईल ते कर" असे 'भगवंतांनी म्हटले आहे खरे; पण त्याचा अर्थ फार खोल आहे. ज्ञानाने किंवा मक्तीने बुद्धि साम्यावस्थेस पोचली हाणजे वाईट इच्छाच शिल्लक रहात नसल्यामुळे अशा ज्ञानी पुरुषाचे 'इच्छास्वातंत्र्य' त्यास किंवा जगास कधीच अपायकारक होऊ शकत नाही. ह्मणून “हें ज्ञान तूं समजून घेतलेस (विमृश्य) झणजे तूं स्वयंप्रकाश होशील, व नंतर (आधी नव्हे) स्वेच्छेने में कर्म करशील तेंच धर्म व प्रमाण होईल; आणि अशा प्रकारची स्थितप्रज्ञाची अवस्था तुला प्राप्त झाल्यावर तुझ्या इच्छेला आळा घालण्याचंः जरूर रहाणार नाही," असा त्यांतील खरा भावार्थ आहे. असो; ज्ञानापेक्षा गीतेत भक्तीलाच विशेष महत्व दिले आहे हे रहस्याच्या १४ व्या प्रकरणांत आम्ही दाखविले आहे. या सिद्धान्ताला अनुसरून एकंदर गीताशास्त्राचा आतां भक्तिपर उपसंहार करितात-] (६४) सर्व गुह्यांतले गुह्य अशी अखेरची एक गोष्ट पुनः मी सांगतो ऐक. तूं माझा अत्यंत आवडता आहेस झणून सुझ्या हिताची