पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/३६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय १८. ३४७ विविक्तसेवी लध्वाशी यतवाकायमानसः। ध्यानयोगपरो नित्यं वैराग्यं समुपाश्रितः ॥ ५२ ॥ अहंकारं बलं दर्प कामं क्रोधं परिग्रहम् । विमुच्य निर्ममः शान्तो ब्रह्मभूयाय कल्पते ।। ५३ ।। ब्रह्मभूतःप्रसन्नात्मा न शोचाते न कांक्षति । समः सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम् ।। ५४ ।। भक्त्या माभभिजानाति यावान्यश्वास्मि तत्वतः । ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम् ॥ ५५ ॥ सर्वकर्माण्यपि सदा कुर्वाणो मद्वयपाश्रयः। मत्प्रसादादवाप्नोति शाश्वतं पदमव्ययम्।। ५६ ॥ द्वेष दूर करून, (५२) 'विविक्त' म्हणजे निवडक किंवा एकान्त स्थळी रहाणारा मिताहारी, काया वाचा व मन ज्याच्या ताब्यांत, आणि नित्य ध्यानयुक्त व विरक्त, (५३) ( तसेंच) अहंकार, बल, दर्प, काम, क्रोध व परिग्रह म्हणजे पाश सोडून शान्त व ममत्वहित झालेला, ब्रह्मभूत होण्यास समर्थ होतो. (५४) ब्रह्मभूत झाला म्हणजे प्रसन्नचित्त होऊन तो कशाची आकांक्षा धरीत नाही, व कशाचा द्वेषहि करीत नाहीं; आणि सर्वांभूती सम होऊन माझी परम भक्ती प्राप्त करून घेतो. (५५) भक्तीने मी केवढा व कोण आहे याचे त्याला तात्विक ज्ञान होते, आणि याप्रमाणे माझी तात्विक ओळख झाल्यावर तो माझे ठायींच प्रवेश करितो; (५६) आणि माझाच आश्रय करून सर्व कमें मेहमी करीत असतांहि माझ्या अनुग्रहाने शाश्वत व अध्यय स्थान त्याला प्राप्त होते. । [वरील सिद्धावस्थेचे वर्णन कर्मयोग्याचे आहे, कर्म-संन्यास करणान्या पुरुषाचे नव्हे, हे लक्षात ठेविले पाहिजे. आरंभीच ४५ व ४९ व्या श्लोकांत हे वर्णन आसक्ति से डून कर्मे करणाराचे आहे असे म्हटले असून शेवटी "सर्व कम करीत असतांहि "असे ५६ व्या श्लोकांस शब्द आहेत. भक्त