पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/३६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. $$ सिद्धि प्राप्तो यथा ब्रह्म तथानोति निबोध मे। समासेनैव कौतेय निष्ठा ज्ञानस्य या परा ॥ ५० ॥ बुद्धया विशुद्धया युक्तो धृत्यात्मानं नियम्य च । शब्दादीन्विषयांस्त्यक्त्वा रागद्वेषौ व्युदस्य च ॥ ५१ ।। पण तेवढ्यासाठी ही कम सोडून देणे बरोबर नाही. कोणत्याहि कार, णाने का होईना जे कर्म एकदा आपले म्हणून परकारले ते कितीहि कठिण वा अप्रिय असले तरी आसक्ति सोडून केलेच पाहिजे. कारण मनुष्याचा लहानमोठेपणा धंद्यावर अवलंबून नसून, ज्या बुद्धीने तो सदर धंदा अगर कर्म करितो त्या बुद्धीवर त्याची योग्यता अध्यात्मदृष्टया | अवलंबून आहे (गी. २.४९). ज्याचें मन शान्त असून ज्याने सर्व- भूतान्तर्गत ऐक्य ओलाखले तो धंद्याने अगर जातीने व्यापारी अपो वा खाटीक असो; निष्काम बुद्धाने हे धंदे करणारा सदर पुरुष स्नान- संध्याशील ब्राह्मणाइतका किंवा शूर क्षत्रियाइतकाच थोर व मोक्षाला अधिकारी आहे. इतकेच नव्हे तर कमैं सोदिल्याने जी सिद्धि मिळाव याची तीच निष्काम बुद्धीने आपआपलं धंदे करणारांस मिळत्ये असे १९ च्या श्लोकांत सष्ट म्हटले आहे. भागवत धर्मातील जे काय रहस्य ते हेच होय; याप्रमाणे आचरण ठेवून हे ताय अंनलांत आणणे अशक्य नाही हे महाराष्ट्रसंत मंडळीच्या इतिहासावरून उघड होते (गीतार. प्र. १३ पृ. १३७ पहा). अतां आपल्या कर्मात तत्पर राहिल्यानेच अखेर मोक्ष कसा मिळतो याचे वर्णन करितात-] (५०) (याप्रमाणे )सिद्धि प्राप्त झाल्यावर (स्या पुरुषाला) ज्ञानाची परमावधीची निष्ठा जे ब्रह्म ते हे कौंतेया ! ज्या प्रकारे प्राप्त होते ते मी थोडक्यांतच सांगतो ऐक. (५१) शुख बुद्धीने युक्त होत्साता धैर्याने आपले संयमन करून, शब्दादि (इंद्रियांचे) विषय सोडून, आणि प्रीति व - - - - - -