पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/३५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. $$ ब्राह्मणक्षत्रियविशां शूद्राणां च परंतप । कर्माणि प्रविभक्तानि स्वभावप्रभवैर्गुणैः ॥ ४ ॥ शमो दमस्तपः शौचं क्षांतिरार्जवमेव च । शानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्मकर्म स्वभावजम् ॥ ४२ ॥ शौर्य तेजो धृतिर्दाक्ष्यं युद्धे चाप्यपलायनम् । दानमीश्वरभावश्च क्षात्रं कर्म स्वभावजम् ॥ ४३ ।। कृषिगौरक्ष्यवाणिज्यं वैश्यकर्म स्वभावजम् । परिचर्यात्मकं कर्म शूद्रस्यापि स्वभावजम् ॥ ४४ ॥ व १९२ पहा) ज्या गुणकर्मविभागाच्या तत्त्वावर चातुर्वर्थरूपी शास्त्र. व्यवस्था निर्माण झाली, त्याचा पूर्ण खुलासा तेव्हां केलेला नाही. यासाठी ज्या संस्थेने समाजांत प्रत्येकाचे कर्तव्य, 'नियत,' होते ह्य. ठरले जाते, त्या चातुर्वर्याची गुणत्रयविभागाने उपपत्ति सांगून त्याच. बरोबर प्रत्येक वर्णाची याप्रमाणे नियत झालेली कर्तव्यकमेहि आतां सांगतात---] (४१) हे परंतपा! ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद यांची कमैं, स्थांच्या स्वभावजन्य म. प्रकृतिसिद्ध गुणांपमाणे पृथक् विभागलेली आहेत. (४२) शम, दम, तप, शुचिर्भूतपणा, शान्ति, सरळपणा (आर्जव), ज्ञान म्हणजे अध्यात्मज्ञान, विज्ञान म्ह. विविधज्ञान, व आस्तिक्यबुद्धि, हैं ब्राह्मणाचे स्वभावजन्य कर्म होय. (४३) शौर्य, तेजस्विता, धैर्य, दक्षता, युद्धांतून पलायन न करणे, दातत्व आणि (प्रजेवर) सत्ता चाल. विणे, हे क्षत्रियाचे स्वभावजन्य कर्म होय, (४४) कृषि म्ह० शेती, गोरक्ष्य म्हणजे गुरेढेारे पाळण्याचा धंदा, आणि वाणिज्य म्ह० व्यापार, है वैश्याचे स्वभावजन्य कर्म होय. आणि तसेंच सेवा करणे हे शूद्राचे स्वभावजन्य कर्म होय.