पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/३५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३४० श्रीमद्भगवद्गीता. यदग्रे चानुबंधे च सुखं मोहनमात्मनः । निद्रालस्यप्रमादोत्थं तत्तामसमुदाहृतम् ॥ ३९ ॥ (असते), तें सुख राजस म्हटले आहे. (३९) आणि जे प्रारंभी व अनुबंधांत म्हणजे परिणामीहि आपल्याला मोह पाडते, व जे निद्रा, आळस व प्रभाव म्हणजे कर्तव्याचा विसर यांपासून होते ते सुख तामस म्हटले आहे.

[५७ व्या श्लोकांतील आत्मबुद्धि याचा अर्थ आम्ही 'आत्मनिष्ठ बुद्धि'

असा केला आहे. परंतु 'आरम' म्हणजे 'आपण' असा अर्थ घेऊन त्याच पदाचा 'आपली बुद्धि' असाहि अर्थ करितां येईल. कारण मागे (६.२१) अत्यंत सुख केवळ 'बुद्धिग्राह्म' व 'अतोंद्रिय' असते असे म्हटले आहे. परंतु कसाहि अर्थ केला तरी तात्पर्य एकच आहे. खरे व नित्य सुख इंद्रियोपभोगांत नसून केवळ बुद्धिग्राह्य आहे असे जरी म्हटले, तरी हे खरें व अत्यंत सुख बुद्धीला प्राप्त होण्यास काय करावें लागते याचा विचार केला म्हणजे बृद्धि आत्मनिष्ट झाल्याखेरीज हैं परमावधीचे सुख मिळत नाही, असें गीतेच्या सहाव्या अध्यायावरून स्पष्ट होते (गी. ६.२१, २२). 'बुद्धि' हे इंद्रिय असे आहे की, तें एका बाजूने त्रिगुण प्रकृतीच्या पसायाकडे पहाते, व दुसन्या बाजूने या पसायाच्या बुडाशी ह्मणजे सर्व भूतांत एकस्वाने असणाच्या आत्म- स्वरूपी परब्रह्माचाहि त्याला बोध होऊ शकतो म्हणून इंद्रियनिग्र- हाने त्रिगुणात्मक प्रकृतीच्या पसायांतून बुद्धि कादन अंतर्मुख व आरम- निष्ट केली-प्राणि पातंजल योगाने जे काय साधावयाचे ते हेच समजे ती प्रसन्न होऊन खमा व अत्यंत सुखाचा मनुष्यास अनुभव येतो, असें तात्पर्य आहे. आध्यात्मिक सुखाच्या श्रेष्ठत्वाबद्दल गीतारहस्याच्या ५ व्या प्रकरणांत (पृ. ११४-१७) केलेला खुलासा पहा. आतां हा त्रिविध भेदच या जगांत भरला आहे असे सामान्यतः सांगतात-1