पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/३५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय 16, $$ सुखं त्विदानी त्रिविधं शृणु मे भरतर्षभ । अभ्यासाद्रमते यत्र दुःखांतं च निगच्छति ।। ३६ । यत्तद्ने विषमिव परिणामेऽमृतोपमम् तत्सुखं सात्त्विकं प्रोक्तमात्मवुद्धिप्रसादजम् ।। ३७ ।। विषयेद्रियसंयोगाद्यत्तदनेऽमृतोपमम् । परिणामे विपमिव तत्सुखं राजसं स्मृतम् ॥ ३०॥

आहे. तद्वतच सात्त्विक तृतीचे लक्षण सांगतांनाहि तोच गुण प्रधान

मानिला पाहिजे. शिवाय राजस पति फलाकांक्षी असत्ये असे पुढच्याच श्ले कांत वर्णन आहे; ह्मणून सात्विक धृति त्याच्या विरुद्ध अफलाकांक्षी असली पाहिजे असे पुढील श्लोकावरूनही सिद्ध होते. सारांश निश्च याची दृढता ही नुस्ती मानसिक क्रिया आहे, आणि ती बरी किंवा वाईट हे ठरविण्यास ज्या कामाला ही क्रिया लावतात ते काम कसे आहे ते पाहिले पाहिजे. झोप आणि आळस इत्यादि कामां- तच जर दृढनिश्चय असेल तर तो तामस, फलाशेने निस्य व्यवहारां- तली कामे करण्यांत असेल तर राजस, आणि फलाशा त्यागरूप यो- गांत दृढनिश्चय असेल तर तो साश्चिक होय. याप्रमाणे धृतीचे भेद झाले. आतां सुखाचेहि गुणभेदाने तीन प्रकार कसे होतात ते सांग- तात- (३६) आतां हे भरतश्रेष्ठा! सुखाचेहि तीन मी प्रकार सांगतो ऐक अभ्यासाने म्ह० सतत परिचयाने ज्यांत रमतो व जेथे दुःखाचा अंत प्राप्त होतो, (३७) जें आरंभी विषासारखे पण परिणामी अमृततुल्य ते आत्म. निष्ठ बुद्धीच्या प्रसनतेपासून होणारे (म्हणजे आध्यात्मिक) सुस तारिखक मटले आहे. (३८) इंद्रिये व त्यांचे विषय यांच्या संयोगापासून होणारे (म्हणजे आधिभौतिक), जें प्रथम अमृतासारखें व परिणामी विपासारखें