पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/३५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३३० श्रीमद्भगवद्गीता. यया तु धर्मकामार्थान् धृत्या धारयतेऽर्जुन । प्रसंगेन फलाकांनि धृतिः सा पार्थ राजसी ॥ ३४ ॥ यया स्वप्नं भयं शोकं विषादं मदमेव च । न विमुंचति दुर्मेधा धृतिः सा पार्थ तामसी ॥ ३५ ॥ मन, प्राण व इंद्रिये यांचे व्यापार, (कर्मफलस्यागरूप) योगाने चालविले जातात, ती धृति हे पार्था ! सात्विक होय. (३४) हे अर्जुना ! ज्या धृतीने धर्म, काम व अर्थ (हे पुरुषार्थ) चालविले जातात व (धर्मार्थकामांतील) प्रसंगानुसार जी फलाची इच्छा ठवित्ये, ती धृति हे पार्था ! राजस होय. (३५) ज्या धृतीने मनुष्य दुर्बुद्ध होऊन झोप, भय, शोक, विषाद आणि मद ही सोडीत नाही ती वृति हे पार्था ! तामस होय. कृति ' या शब्दाचा अर्थ धैर्य असा आहे; पण शारीरिक धैर्य या ठिकाणी विवक्षित नसून मनाचा दृढनिश्चय असा या शब्दाचा या प्रकरणांत अर्थ आहे. निर्गय करणे हे काम बुद्धीचे आहे. परंतु बुद्धीने योग्य निर्णय केला तरी तो कायम टिकला पाहिजे. निर्णयाला याप्रमाणे बळकटपणा आणणे हा मनाचा धर्म होय. म्हणून प्रति किंवा मान- सिक धैर्य हा गुण मन आणि बुद्धि या दोघांच्या साहाय्याने उत्पन्न होतो असे म्हटले आहे. पण अव्यभिचारी ह्म. इकडे तिकडे न धाव- णाऱ्या धैर्याने मन, प्राण व इंद्रिये यांचे व्यापार चालविले पाहिजेत, एवढे झटल्याने सात्विक तीच लक्षण पुर हात नाही. हे व्यापार कशावर घडावयाचे किंवा या व्यापाराचे कर्म काय हे सांगितले पाहिजे. आणि ते कर्म ‘योग' या शब्दाने सांगितले आहे. अर्थात् 'योग' या शब्दाचा केवळ 'एकाग्र चित्त' जसा अर्थ करून काम भागत नाही. ह्मणून आह्मीं त्याचा अर्थ, कर्मफलप्यागरूर योग असा पूर्वापार संदर्भावरून केला आहे. सात्विक कर्म साविक कर्ता गैरेची लक्षणे सांगतांना 'फलाची आसक्ति सोडणे' हा गुण प्राप्रमाणे प्रधान मानिला