पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/३५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

- १३६ श्रीमद्भगवद्गीता. रागी कर्मफलप्रेप्सुलुब्धो हिंसात्मकोऽशुचिः । हर्षशोकान्वितः कर्ता राजमः परिकीर्तितः । २७ ।। अयुक्तः प्राकृतः स्तब्धः शठो नैष्कृतिकोऽलसः । विषादी दीर्घसूत्री च कर्ता तामस उच्यते ॥ २८ ॥ (कर्ता) म्हटले आहे. (२७) विषयासक्त, लोभी, (सिद्धि व असिद्धि यांचे ठायीं यथानुक्रम) हर्ष व शोक यांनी युक्त, कर्मफलाच्या प्राप्तीची इच्छा धरणारा, हिंसात्मक आणि अशुचि अशा कास राजस म्हणतात, (२८) अयुक्त म्ह० चंचळ बुद्धीचा, अडाणी, ताठलेला, ठक, नैष्कृतिक म्ह. बुडव्या, आळशी, सदा खटू व दीर्घसूत्रा म्हणजे चेंगट किंवा घटकेच्या ठिकाणी महिना लावणारा' अशा कास तामस म्हटले आहे. । (२८ व्या श्लोकांत नैष्कृतिक (किम+कृत् छेद करणे, कापणे) याचा दुसन्याचे कामचा छेद करणारा, किंवा ते बुडविणारा असा अर्थ आहे. पण या ऐवजी कित्येक नैकृतिक असा पाठ घेतात. 'निकत' म्हणजे शठ असा अमरकोशांत अर्थ दिलेला आहे. पण शठ हे विशे- षण पूर्वी आले असल्यामुळे आम्ही नैष्कृतिक हा पाठ स्वीकारिला आहे. असो; या तीन प्रकारच्या कल्यापैकी सात्त्विक कर्ता, हाच अकर्ता अलिप्तकर्ता किंवा कर्मयोगी होय. फलाशा सोडून दिली तरी कमैं करण्याची त्याची उमेद, उत्साह व सारासारविचार कायम असतात, असें वरील श्लोकावरून स्पष्ट होते. जगाच्या विविध पसान्याचं जें हैं वर्णन चालू आहे तेच बुद्धि, धृति व सुस्त्र यांसहि आतां लावून दाख. वितात. बुद्धि म्हणजे दुसन्या अध्यायांत (२.४१) सांगितलेली व्यव- सायास्मिक बुद्धि अथवा निश्चय करणारे इंद्रिय असा अर्थ या श्लोकांतून इष्ट माहे. व त्याचा खुलासा गीतारहस्य प्रकरण ६ पृ.१३७-१४० यांत केला आहे तो पहा.] - - - - - - - "