पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय २. श्रीभगवानुवाच । SS अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे । गतासूनगतामूंश्च नानुशोचन्ति पंडिताः ॥ ११ ॥ अर्जुनाच्या मनाचा कल आतां संन्यासनिष्टेकडे वळला होता. म्हणून त्याच मागीतील तत्त्वज्ञानाने अर्जुनाची चूक प्रथम त्याच्या नजरेस आणून देऊन पुढे ३९ व्या श्लोकापासून कर्मयोगाच्या प्रतिपादनास भगवंतांनी सुरवात केली आहे. सांख्य मागाँतले पुरुष ज्ञानात्तर कमें करीत नसले तरी त्यांचे ब्रह्म ज्ञान व कर्मयोगांतील ब्रह्मज्ञान काही निराळे नसते. तेव्हा सांस्यनिष्टप्रमाणे पाहिले तरीहि आत्मा जर अवि- नाशी व नित्य आहे तर मग 'मी अमक्याला कसे मारूं ही तुझी बडबड होय, असे किंचित उपहासपूर्वक अर्जुनास भगवंताचे प्रथम सांगण आहे. ] श्रीभगवान म्हणाले--(११) ज्यांचा शोक करू नये त्यांचा तं शोक करीत आहेस आणि ज्ञानाच्या बाता सांगतोस! कोशाच प्राण गेले (काय) आणि राहिले ( काय), ज्ञानी परुष त्यांच शेक करीत नाहीत. ।। या श्लोकांत प्राण गेल्याचा किंवा राहिल्याचाहि शोक करीत नाहीत असे विधान आहे. पैकी गेल्याचा शोक करणे साहजिकच असून तो न करण्याबद्दलचा उपदेश करण युक्त आहे. पण प्राण राहिल्याचा शोक कसा व कां करावयाचा अशी शंका येउन टीकाकारांनी त्याबद्दल बरीच चर्च केला आहे; आणि कित्येकांनी मृखं व अज्ञाना लोकांचे प्राण रहाणे हे शोकाचंच कारण होय असें मटले आहे. पण इतका कीस काढीत न बसतां शोक करण ' या शब्दांचाच 'अरे अथवा वाईट वाटणे ' किंवा 'परवा करणे' असा व्यापक अर्थ करावा म्हणजे कांहीच अडचण रहात नाही. ज्ञानी पुरुषास दही गोष्टी सारख्याच असतात, एवंडेच या ठिकाणी सांगणे आहे.