पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/३४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३३० श्रीमद्भगवद्गीता. ज्ञानं ज्ञेयं परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदना । ज्याची बुद्धि अलिप्त असते. त्याने या लोकांना मारिलें तरीहि मारिल असें होत नाही, आणि तें ( कर्म) त्याला बंधकहि होत नाही. | तेराव्या श्लोकांत सांख्य शब्दाचा अर्थ वेदान्तशास्त्र अशा कित्येक टीकाकारांनी केला आहे. पण पुढील म्हणजे चवदावा श्लोक नारायणीय धांत (म. भा. शां. ३४७.८७) अक्षरशः आला असून तेथे तत्पूर्वी प्रकृति व पुरुष या कापिलसांख्यांतील तत्वांचा उल्लेख असल्यामुळे सांख्य या शब्दाने प्रकृतस्थलोहि कापिल सांख्यशास्त्रच अभिप्रेत आहे असे आमचे मत आहे. कर्मफलाची आशा मनुष्यान धरूं नये, किंवा मी अमुक करीन ही अहंकारबुद्धि मनांत ठेवू नये, हा सिद्धान्त पूर्वी गीतेत अनेक वेळा आलेला असद (गी. २.१९:२.४७३ २७५.८-११; १३.२९) तोच येथे " कमांचे फल घइण्यास मनुष्य हा एकटाच कारण नाही" असे सांगून हद केला आहे (गीतार. प्र. ११ पहा). मनुष्य या जगांत असो वा नसो, प्रकृतिस्वनावाप्रमाणे जगाचा अखंड व्यापार नेहमी घालच आहे; व मनुष्य आपण जे काही केले असें समजतो ते केवळ त्याच्या प्रयत्नाचे फल नसून त्याचा प्रयत्न अणि जगांतील इतर व्यापार किंवा चष्टा या सर्वांच्या साह्याने ते काय घडून आलेले असते असा १४ व्या श्लोकाचा अर्थ आहे. उदाहरणार्थ शेती केवळ मनु. ध्याच्याच प्रयत्नावर अवलंबून नसून जमीन, बी, पाऊस, खत, बैल इत्यादिकांचे गुणधर्म किंवा व्यापार यांची, शेती सफल होण्यास अवश्य मदत लागरये. मनुप्याचा प्रयत्न सिद्ध होण्यास अशा रीतीने जगाच्या ज्या विविध व्यापारांचे साहाय्य लागते त्यांनी काही व्यापार आपणांस माहीत असून त्यांची अनुकूलता पाहनच मनुष्य प्रयत्न करीत असतो. पण आपल्या प्रयत्नांस अनुकूल किंवा प्रतिकूल असणारे दुसरे असेहि काही सष्टीव्यापार असतात की त्यांची आपणांस माहिती नसत्ये, यांसच देव असें महणतात; व कार्य घड़न येण्याचें हैं पांचवें कारण