पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/३४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गांता, भाषान्तर व टीपा-अध्याय १८. $ पंचैतानि महाबाहो कारणानि निबोध मे। सांख्ये कृतांते प्रोक्तानि सिद्धये सर्वकर्मणाम् ॥ १३॥ अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथग्विधम् । विविधाश्च पृथक चेष्टा दैवं चैवात्र पंचमम् ॥ १४ ॥ शरीरवाडमनोभियत्कर्म प्रारभते नरः।। न्याय्यं वा विपरीतं वा पंचैते तस्य हेतवः ॥१५॥ तत्रैवं सति कारमात्मानं केवल तु यः। पश्यत्यकृतवुद्धित्वान्न स पश्यति दुर्मतिः॥ १६॥ यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते। हत्वा स हमाल्लोकान हन्ति न निबद्धयते ॥ १७ ॥ संहार केला आहे. सर्व कर्माचा संन्यास केव्हांच गीतेस इष्ट नाही. फलाशेचा त्याग करणारा पुरुषच गीतेप्रमाणे खरा किंवा नित्यसंन्यासी होय (गी. ५.३). खरा स्याग म्हणजे ममत्वयुक्त फलाशेचा अर्थात् अहंकारबुन्द्रीचा त्याग. हाच सिद्धांत दृढ करण्यास आतां आणखी कारण सांगतात- (१३)हे महाबाहो ! सर्व कर्म घडून योग्यास सांख्यांच्या सिद्धा, नतांत जी पांच कारणे सांगितली आहेत ती मी (तुला) सांगतो ऐक. (१४) अधिष्ठान (जागा), तमाच कर्ता, निरनिराळ्या प्रकारचे कारण म्हणजे साधन किंवा हत्यार, अनेक प्रकारच्या (कर्याच्या) पृथक पृथक चेपा म्हणजे व्यापार, आणि त्याबरोबरच पांचवें देव होय. (१५) शरी- राने, वाचेने किंवा मनाने मनुष्य में जें कर्म आरंभितो-मग ते न्याय्य असो वा विपरीत म्हणजे अन्याय्य असो-याची ही पांच कारणे आहेत. (१६) या प्रकारची (खरी) स्थिती असतां, बुद्धि संस्कृत नसल्यामुळे मी एकटाच कर्ता आहे असे ज्याला वाटते त्या दुर्मतीला काहीच कळत नाहीं (असे म्हटले पाहिजे), (१७) ज्याला मी करितों' ही भावना नाही, व