पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/३४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. त्यागी सत्त्वसमाविष्टो मेधावी छिन्नसंशयः ॥ १०॥ न हि देहभृता शक्यं त्यक्तुं कर्माण्यशेषतः। यस्तु कर्म फलत्यागी स त्यागीत्यभिधीयते ।। ११ ॥ $$ अनिष्टमिष्ट मिश्रं च त्रिविधं कर्मणः फलम् । भवत्यत्यागिनां प्रेत्य न तु संन्यासिनां क्वचित् ॥ १२ ।। यांच्या अर्थाचा हा खुलासा झाला. आता याच तत्त्वाला अनुसरून खरा त्यागी किंवा संन्यासी कोण हे सांगतात--] (१०) एखाद कर्म अकुशल म्हणजे अकल्याणकारक असले तर त्याचा द्वेष करीत नाही, व दुसरे कल्याणकारक किंवा फायद्याचे आहे म्हणून त्यांत अनुषक्त होत नाही, तो सत्वशील बुद्धिमान् व संशयविर. हित त्यागी म्ह० संन्यासी म्हणावयाचा (११) कारण ज्याला म्हणूम देह आहे त्याला कर्माचा निःशेप त्याग करणे शक्य नाही. म्हणून ज्याने (कमें न सोडितां) फक कर्मफलांचा त्याग केला त्यालाच (खरा) त्यागी म्हणजे संन्यासी म्हटले आहे. [ अशा प्रकारे, म्ह० कर्म न सोडितां फक्त फलाशा सोडून जो त्यागी झाला त्याला त्याच्या कर्माची कोणतीच फलें बंधक होत नाहीत असे आतां सांगतात--] (१२) अनिष्ट, इष्ट व (काही इष्ट व काही अनिष्ट असें) मिश्र याप्रमाणे कर्माचे तीन प्रकारचे फल, मेल्यावर अत्यागी म्हणजे फलाशेचा स्याग न करणाऱ्या पुरुषास मिळते. पण जो संन्यासी हणजे फलाशा सोडून कर्मे करणारा त्याला (हें फल ) कधीहि मिळत नाहीं; ह्मणजे बांधू शकत नाही. । [स्थाग, स्यागी व संन्यासी यांच्याबद्दलचे हे विचार पूर्वी (गी. ३. ४-७५.२-१०६.१) अनेक ठिकाणी आले असुन त्यांचाच येथे ४प.