पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/३४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय १८. ३२७ मोहात्तस्य परित्यागस्तामसः परिकीर्तितः । ७ ।। दुःखमित्येव यत्कर्म कायक्लेशभयात्यजेत् । स कृत्वा राजसं त्यागं नैव त्यागफलं लभेत् ॥ ८ ॥ कार्यमित्येव यत्कर्म नियतं क्रियतेऽर्जुन । संगं त्यक्त्वा फलं चैव स त्यागः सात्त्विको मतः ॥ ९॥ $$न द्वेश्यकुशलं कर्म कुशले नानुषज्यते । (७) जे कर्म (स्वधर्माप्रमाण) नियत म्ह० नेमलेले त्याचा संन्यास : म्ह ० त्याग करणे (कोणासहि) योग्य नाही. मोहान केलेला त्याचा त्याग तामस म्हटला आहे. (८) शरीराला कष्ट होतील या भोतोने, म्ह० दुःख- कारक एवढ्याचसाठी, जर कर्म सोडील तर त्याचा त्याग राजस होऊन त्यागाचे (म्हणून जें) फल (ते) त्याला मिळणार नाही. (९) अर्जुना (स्वधर्माप्रमाण) नियत म्हणजे नेमलेले कार्य म्हणजे कर्तव्य ह्मणूनच लें कर्म संग व फल सोडून केले जाते, तेव्हा त्याला सात्त्विक त्याग सम- जतात. सातव्या श्लोकांत 'नियत' या पदाचा नित्यनैमित्तिकादि भेदांपैकी 'नित्य' कर्म असा अर्थ कित्येक करितात तो बशेवर नाही. नियत कुरु कर्म त्वं' (गी. ३.८) या ठिकाणी नियत पदाचा जो अर्थ आहे 'तोच यथेहि घेतला पाहिजे, मीमांसकांची परिभाषा येथे विवक्षित नाही, वर सांगितलंच आहे. नियत' शब्दाऐवजी 'कार्य हा शब्द गी. ३.१९ यांत आला असून ९ व्या श्लोकांत 'कार्य' व 'नियत' हे शब्द एकत्र आले आहेत. स्वधर्माप्रमाणे प्राप्त झालेले कोणतेहि कर्म न सोडितां तेच कर्म कर्तव्य म्हणून करणे (गी. ३.१९ पहा) याला साविक त्याग म्हणतात, इतकेच नव्हे तर कर्मयोगशास्त्रांत यालाच त्याग किंवा संन्यास हे नांव आहे, असें जें या अध्यायाचे आरंभी दु. सच्या श्लोकांत सांगितले स्याचेच हे समर्थन आहे. त्याग किंवा संन्यास