पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/३४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. नियतस्य तु संन्यासः कर्मणो नोपपद्यते । तर ती सर्व काम्यच असल्यामुळे (गी. २.४२-५४), त्यांचाहि संन्यास करावा असे आतां प्राप्त होते; व तसे केले तर यज्ञचक बुडून (३. १६) सृष्टि उध्वस्त होण्याचाहि प्रसंग येतो. तेव्हां करावे काय ? गीता या प्रश्नाचे उत्तर असें देत्ये की, यज्ञदानादि कम स्वर्गादि फल- प्राप्त्यर्थ करा म्हणून शास्त्रांत जरी सांगितले असले, तरी यज्ञ करणे दान करणे, तप करणे इ. माझे कर्तव्य होय (गी. ७.११,१७ व २० पहा), अशा निष्काम बुद्धीने लोकसंग्रहार्थ हीच कमै करितां येत नाहीत असे नाही. हाणून लोकसंग्रहार्थ स्वधर्माप्रमाणे दुसरी निष्काम कम जशी करावयाची तद्वतच यज्ञदानादि कर्मे सुद्धा फलाशा व आसक्ति सोडून केली पाहिजेत. कारण, ती नेहमीच 'पावन' म्हणजे चित्तशुद्धि- कारक किंवा परोपकारबुद्धि वाढविणारी आहेत. मूळांत "एतान्यपि- ही सुद्धा" असे जे शब्द आहेत त्यांचा अर्थ "इतर निष्काम कर्माप्र- माणे ही यज्ञदानादि कम सुद्धा" असा आहे. अशा रीतीने फलाशा सोडून किंवा भक्तिदृष्ट्या केवळ परमेश्वरार्पणबुद्धीने ही कर्मे केली म्हणजे सृष्टीचे रहाटगाडमें चालू राहून कांच्या मनांतली फलाशा सुटलेली असल्यामुळे ही कमें मोक्षप्राप्तीच्याहि आङ न येतां सर्व गोष्टीचा नीट मेळ बसतो; व कर्मासंबंधाने कर्मयोगशास्त्राचा हाच अखे रचा निश्चित सिद्धान्त आहे (गीता. २.४५ वरील आमची टीप पहा) मीमांसकांचा कर्ममार्ग आणि गीतेतील कर्मयोग यांमधला भद गीता- रहस्यांत (पृ. २०९-२९२; व पृ. ३४२-३४४ ) अधिक स्पष्ट करून दाखविला असल्यामुळे, या विषयाची येथे जास्त चर्चा करीत नाही. असे; अर्जुनाच्या प्रश्नावरून संन्यास व त्याग यांच्या अर्थाचा कर्म- योगदृष्टया याप्रमाणे खुलासा केल्यावर, सात्त्विकादि भेदाने कर्म कर ण्याचे निरनिराळे प्रकार कोणते हे सांगून तोच अर्थ दृढ करितात--