पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/३३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. त्यागस्य च हृषीकेश पृथक्कशिनिघूदन ।। १।। ज्ञानी पुरुषांनी स्वीकारलेले दोन प्रकारचे आयुष्यक्रमणाचे मार्ग दुसऱ्या अध्यायाच्या आरंभीच सांगितले, एक सांख्य (सन्यास) व दुसरा कर्म- योग (योग); आणि हे दोन्ही मार्ग जरी मोक्षप्रद असले तरी त्यांतले त्यांत कर्मयोगच अधिक श्रेयस्कर असा अखेर सिद्धान्त केला (गी. ५.२). पैकी कर्मयोगांत बुद्धि श्रेष्ठ समजतात; बुद्धि स्थिर व सम असली म्हणजे कर्माची बाधा लागत नाहीं; कर्म कोणाला सुटले नाही व कोणी सोडूंहि नये; फक्त फलाशा सोडिला म्हणजे झाले; स्वतःकरितां नको तरी लोकसंग्रहार्थ कमें करणं जरूर आहे; बुद्धि चांगली असली म्हणजे ज्ञानाचा व कर्माचा विरोध येत नाही; आणि पूर्वीची वहिवाट पहातां जनकादि याप्रमाणेच वागले; इत्यादि युक्तिवाद तिसऱ्या- पासन पांचव्या अध्यायापर्यंत आहे. कर्मयोगसिद्भयर्थ लागणारी बुद्धीची ही समता कशी प्राप्त करावी, आणि हा कर्भयोग चालवीत असतां त्यानेच अखेर मोक्ष कसा मिळतो, हा यापुढला विषय होय. ही समता प्राप्त होण्यास इंद्रियनिग्रह करून एकच परमेश्वर सर्वांभूती भरला आहे हैं पुरे जाणिले पाहिजे, दुसरा मार्ग नाही. पैकी इंद्रियनिग्रहाचे वर्णन सहाव्या अध्यायांत करून सातव्या अध्यायापासून सतराव्या अध्याया- पर्यत कर्मयोग आवरीत असतांच परमेश्वराचे ज्ञान कसे होते, व ते ज्ञान कोणते, हे सांगितले आहे. पैकी सातव्यांत व आठव्यांत क्षराक्षराचे किंवा व्यक्ताव्यक्तांचे ज्ञानविज्ञान सांगून, परमेश्वराच्या व्यक्त रूपापेक्षा अव्यक्त जरी श्रेष्ट आहे, तरी परमेश्वर एक आहे ही बुद्धी ढळू न देतां व्यक्ताचीच उपासना करणे प्रत्यक्षावगम्य अतएव सर्वीस सुलभ हा अर्थ नवव्या अध्यायापासुन बाराव्या अध्यायापर्यंत वर्णिला आहे. नंतर क्षराक्षरविचारांत ज्याला अव्यक्त म्हणतात तोच मनुष्याच्या शरीरातील आस्मा होय असा क्षेत्रक्षेत्रज्ञ विचार तेरव्या अध्यायांत सांगितला व पुढे एकाच अव्यक्तापासुन प्रकृतीच्या गुणांमुळे जगांतील विविध स्वभा-