पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/३३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३.८ श्रीमद्भगवद्गीता. SS अश्रद्धया हुतं दत्तं तपस्तप्तं कृतं च यत् । __ असदित्युच्यते पार्थ न च तत्प्रेत्य नो इह ॥ २० ॥ इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जु । संवादे श्रद्धात्रयविभागयोगो नाम सप्तदशोऽध्यायः ॥ १७ ॥ । यज्ञ, तप, व दान ही प्रमुख धार्मिक कृत्ये होत; व यासाठी जें । कर्म करावयाचे त्यालाच मीमांसकांनी यज्ञार्थ कर्म असें सामान्य नांव दिले आहे. हे कर्म करितांना फलाशा असली तरी ती धर्माला अनुकूल असल्यामुळे ही कमें 'सत्' या वर्गात पडून सर्व निष्काम कर्म "तत्-ते ह्मणजे पलीकडले" या वर्गात येते. याप्रमाणे प्रत्येक कारभी तत्सत्" असा जो ब्रह्मसंकल्प ह्मगतात, त्यात या दोन्ही कर्माचा समावेश होत असल्यामुळे ही दोन्हीं कमें ब्रह्मानुकूलच हटलीं पाहिजेत. गीतारहस्य पृ. २४३ पहा. बाकी राहिले 'असत्' त्याची वाट काय हे आतां सांगतात-] (२८) अश्रद्धेने में हवन केले, जे (दान) दिले, जें तप आचरिलें, आणि जे काही (कर्म) केले, ते 'असत्' ह्मटले आहे. हे पार्था ! ते (कर्म) मेल्यावर (परलोकी) नाही, आणि या लोकोंहि (लाभत) नाही. तात्पर्य, ब्रह्मस्वरूपाचा बोधक जो सर्वमान्य संकल्प त्यांतच निष्काम बुद्धीने, किंवा केवळ कर्तव्य ह्मणून, केलेल्या सात्विक कर्माचा आणि शास्त्राप्रमाणे सद्बुद्धीने, केलेल्या प्रशस्त कर्माचा किंवा सरकर्माचा समावेश होतो. बार्काची कम फुकट होत. ब्रह्मनिर्देशांतच ज्या कर्माचा समावेश होतो. आणि ब्रह्मदेवाबरोबरच जे कर्म उत्पन्न झाले (गी. ३.१०), व जे कोणालाहि सुटले नाही, ते सोडून द्या असें ह्मणणे योग्य नव्हे हे यावरून सिद्ध होतें तत्सत्' या ब्रह्मनिर्देशाचा वरील कर्मयोगपर अर्थ या अध्यायांत कर्मविभागाला जोडून सांगण्याचा