पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/३३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गोता, भाषान्तर व टीपा-अध्याय १७. ३१७ तस्मादोमित्युदाहृत्य यज्ञदानतपः क्रियाः । प्रवर्तन्ते विधानोक्ताः सततं ब्रह्मवादिनाम् ॥ २४ ॥ तदित्यनभिसंधाय फलं यशतपःक्रियाः । दानक्रियाश्च विविधाः क्रियन्ते मोक्षकांक्षिभिः ॥ २५॥ सद्भावे साधुभावे च सदित्येतत्प्रयुज्यते । प्रशस्ते कर्मणि तथा सच्छब्दः पार्थ युज्यते ॥ २६ ॥ यशे तपसि दाने च स्थितिः सदिति चोच्यते । कर्म चैव तदर्थीयं सदित्येवाभिधीयते ॥ २७ ॥

[सर्व सृष्टीच्या आरंभी ब्रह्मदेवरूपी पहिला ब्राह्मण, देव आणि यज्ञ

हे उत्पन्न झालेले आहेत असें पूर्वीच (गी. ३.१०) सांगितले आहे. पण हे सर्व ज्या परब्रह्मापासून निर्माण झाले, त्या परब्रह्माचे स्वरूप "ॐतत्सत्' या तीन शब्दांत आहे. म्हणून "तरसत्" हा संकल्प सर्व सृष्टीचे मूळ होय, असा या श्लोकाचा भावार्थ आहे. आतां या संकल्पातील तीन पदांचं कर्मयोगदृष्टया पृथक् निरूपग करितात--] (२४) तस्मान् म्हणजे जगाला या संकल्लाने आरंभ झाला आहे म्हणून, ब्रह्मवादी लोकांची यज्ञ, दान, तप, आणि इतर शास्त्रोक्त कमें नेहमी असा उच्चार करून प्रवृत्त होत असतात. (२५) 'तत्' या शब्दाने फलाची आशा न टेवितां यज्ञ, तप दान वगरे अनेक प्रकारच्या क्रिया मोक्षार्थी लोक करीत असतात. (२६) अस्तित्व आणि साधुत्व ह्मणजे चांग- लेपणा या अर्थी 'सत्' हा शब्द योजिला जातो; आणि हे पार्था ! तसेच प्रशस्त ह्मणजे चांगल्या कर्मासहि 'सत्' हा शब्द लावण्यात येतो. (२०) यज्ञ, तप आणि शन यांच्या ठिकाणी स्थिति म. स्थिर भावना असगे यालाहि 'सत' असें ह्मणतात; व यांच्यासाठी जे कर्म करावयाचे त्या कर्मालाहि 'सत हेच नांव आहे.