पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/३३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

" -- । - - - - श्रीमद्भगवद्गीता. 5 ॐ तत्सदिति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविधः स्मृतः। ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिताः पुरा ॥ २३ ॥ करण्यांत तरी काय हशील ? गीतेचे या आक्षेपास असें उत्तर आहे का, सात्विक, राजस, तामस हे कर्माचे भेद परब्रह्माला सोडून आहेत असे नाही. ब्रह्म म्हणजे काय हैं ज्या संकल्पात सांगितले आहे त्यांत सात्त्विक कम व सत्कम यांचा समावेश होतो, व त्यामुळे ही कम अध्यात्मदृष्टयाहि त्याज्य नव्हेत, असे निर्विवाद सिद्ध होते (गीतार. पृ. २४३ पहा). परब्रह्माच्या स्वरूपाबद्दल मनुष्याला जे काय ज्ञान प्राप्त झाले आहे ते सर्व ॐतत् सत्" या तीन शब्दाच्या निर्देशांत प्रथित झाले आहे. पैकी अक्षरब्रह्म असून त्याचा उपनिषदांतून निरनिराळ्या प्रकारे अर्थ केलेला आहे (प्रश्न. ५; कठ. २.१५-१७; ते. १.८, छो. १.१; मैघ्यु. ६.३,४; मांडूक्य. १-१२). आणि हे वर्णाक्षररूपी ब्रह्म व ज्या अर्थी जगाच्या आरंभी होते त्या अर्थी सर्व क्रियांना तेथून प्रारंभ होतो. 'तत्त' म्ह० सामान्य काहून पलीकडचे अर्थात् निष्काम बुद्धीने फलाशा सोडून केलेले सात्विक कर्म, आणि 'सत्' म्हणजे फलाची आशा असली तरी शास्त्राप्रमाणे केलेले शुद्र कर्म, असा या संकल्पाचा अर्थ होतो. आणि या अर्था प्रमाणे निष्काम बुद्धीने केलेल्या सात्विक कर्माचाच नव्हे तर शास्त्राप्रमाणे केलेल्या सत्कर्माचाहि पर. ब्रह्माच्या सामान्य व सर्वमान्य संकल्पांत समावेश होतो. म्हणून ही कम त्याज्य होते हैं म्हणणे गैर ठरते. 'तत् ' आणि 'सत्' या दोन काखेरीज ' असत् ' म्हणजे वाईट कर्म शिल्लक राहिले. पण ते उभय लोकीहि गही असल्यामुळे त्याचा संकल्पांत समावेश होत नाही, असे शेवटच्या श्लोकांत दर्शविले आहे. भगवान् म्हणतात--] (२३) परब्रह्माचा तत्सत् ' असा तीन प्रकारे (शास्त्रांत ) निर्देश केला जातो. या (च) निर्देशाने पूर्वी ब्राह्मण वेद व यज्ञ निर्माण केलेले आहेत. - - - - - - - .

. - -