पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/३२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय १७. • ३१५ देशे काले च पात्रे च तद्दानं सात्त्विकं स्मृतम् ॥ २० ॥ यत्तु प्रत्युपकारार्थ फलमुद्दिश्य वा पुनः । दीयते च परिक्लिष्टं तद्दानं राजसं स्मृतम् ॥ २१ ॥ अदेशकाले यदानमपात्रेभ्यश्च दीयते । असत्कृतमवज्ञातं तत्तामसमुदाहृतम् ॥ २२ ॥ (जारणमारणादि कर्मानी ) लोकांना नाइवण्यासाठी जें तप करितात त्याला तामस म्हणतात. । [तपाचे भेद झाले; आतां दानाचे विविध भेद सांगतात--- (२०) दान करणे आपले कर्तव्य आहे अशा बुद्धीने, ( योग्य ) स्थल, काल व पात्र ( यांचा विचार ) पाहून आपल्यावर उपकार न करणान्यास जे दान देतात तें सात्विक म्हटलं आहे. (२१) परंतु ( केलेल्या ) उपका- राचा मोबदला म्हणून, किंवा पुढे काही फलाची आशा ठेवून संकटाने में दान देतात तें राजस म्हटले आहे. (२२) अयोग्य स्थली, अकाली किंवा अपात्रीं सस्काररहित अगर अवहेलनापूर्वक जे दान देतात ते तामस म्हणतात. 1 [आहार, यज्ञ, तप व दान यांप्रमाण ज्ञान, कर्म, कर्ता, बुद्धिति व सुख यांच्या विध्याचे वर्णन पुढील अध्यायांत केले आहे (गा.१८. २०-३९) या अध्यायांतील मुणभेदप्रकरण येथे संपलें. आतां ब्रह्मा- निर्देश घेऊन वर सांगितलेले सात्विक कर्माचें श्रेष्टत्व व संग्राह्यस्व सिद्ध करितात. कारण, वरील एकंदर विवेचनावर सामान्यतःच अशी शंका येण्याचा संभव आहे की, कर्म मात्त्विक असो, राजस असो किंवा जामस असो, कोणतेहि कर्म घेतले तरी त दोषमय व दुःखकारक असल्यामुळे ही सर्व कमें सोडिल्याखेरीज ब्रह्मप्राप्ति होणे शक्य नाही; आणि हे जर खरे तर, अमुक कर्म पाश्विक आणि असुक राजल हा भेद