पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/३२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३०८ श्रीमद्भगवद्गीता. तेषां निष्ठा तु का कृष्ण सत्वमाहो रजस्तमः ॥ १॥ श्रीभगवानुवाच । त्रिविधा भवति श्रद्धा देहिनां सा स्वभावजा। सात्त्विकी राजसी चैव तामसी चेति तां शणु ॥ २॥ सत्त्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत । श्रद्धामयोऽयं पुरुषो या यच्छ्रद्धः स एव सः ॥ ३ ॥ अर्जुन म्हणाला-(१) हे कृष्णा ! श्रद्धेने युक्त असूनहि शास्त्रांतील विधि सोडून जे यजन करितात, त्यांची निष्ठा म्हणजे (मनाची ) स्थिति कोणती बरे समजावयाची ? सात्त्विक, की राजस, की तामस ? गेल्या अध्यायाचे अखेर शास्त्रांतील विधि किंवा नियम पाळले पाहिजेत असे जे सांगितले त्यावर अर्जुनाची ही शंका आहे. शास्त्रावर श्रद्धा असूनहि मनुष्य अज्ञानाने चुकतो. उदाहरणार्थ, सर्वव्यापी परमेश्वराचे भजन पूजन करावे हा शास्त्रविधि सोडून देवतांच्याच नादी लागतो (गी. ५.२३). तरी अशा पुरुपाची निष्ठा म्हणजे अवस्था अगर स्थिति कोणती असा अर्जुनाचा प्रश्न आहे. शास्त्राचा व धर्माचा अश्रद्धेने तिरस्कार करणा-या म्ह० आसुरी लोकांबद्दल हा प्रश्न नव्हे. तथापि प्रसंगानुसार त्यांच्या कर्माची फलहि या अध्यायांत वर्णिली आहेत.] श्रीभगवान् म्हणाले-(२) प्राणिमात्राची ही श्रद्धा स्वभावत: तीन प्रकारची असत्ये; साविक व राजस आणि तामस. (कशी) ती ऐक. (३) सर्व लोकांची श्रद्धा हे भारता ! त्यांच्या त्यांच्या सत्ताप्रमाणे म्हणजे प्रकृति- स्वभाधाप्रमाणे होत असत्ये. मनुष्य हा श्रद्धामय आहे. ज्याची ज्या ठिकाणी श्रद्वा (असत्ये), त्याप्रमाणे तो ( बनत असतो).