पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/३२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय 19. सप्तदशोऽध्यायः। अर्जुन उवाच । ये शास्त्रविधिमुसज्य यजन्ते श्रद्धयान्विताः । । [या श्लोकांतील कार्या कार्यव्यवस्थिति, या पदावरून कर्तव्य- शास्त्रार्ग म्ह. नीतिशास्त्राची कल्पना डोळयापुढे देवून गीता उपदेशिली आहे हे स्पष्ट होते. यासच कर्मयोगशास्त्र असे म्हणतात, हे गीता- रहस्यांत (पृ. ४९-५१) स्पष्ट करून दाखविले आहे.] याप्रमाणे श्रीभगवंतांनी गाइलेल्या म्हणजे सांगितलेल्या उपनिषदांत ब्रह्मविद्यान्तर्गत योग म्हणजे कर्मयोग-शास्त्रावरील श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या संवादांतील दैवासुरसंपद्विभागयोग नांवाचा सोळावा अध्याय समाप्त झाला. अध्याय सतरावा. कर्मयोगशास्त्राप्रमाणे जगाचें धारणपोषण करणारे पुरुष कोणत्या प्रका रचे आणि त्याच्या उलट जगाचा नाश करणारे पुरुष कोण, याचे याप्रमाणे वर्णन झाल्यावर, मनुष्यामनुष्यांमध्ये असे भेद का होतात असा प्रश्न सहज उत्पन्न होतो या प्रश्नाचे सामान्य उत्तर “प्रकृत्या नियताः स्वया"-ज्याचा त्याचा प्रकृतिस्वभाव-असे सातव्याच अध्यायांत आले आहे (७.२०). परंतु सत्त्व रज व तम या गणांचं विवेचन तेव्हां केले नसल्यामुळे या प्रकृतिजन्य भेदाची सविस्तर उपयत्ति तेथे सांगतां आलो नाही. म्हणून चवदाव्या अध्यायांत त्रिगणाचे विवेचन करून आता त्याचमुळे श्रद्वादिकांचेंहि स्वभाव वैचित्र्य कसे उत्पन्न होते ते सांगून ज्ञानविज्ञानाचे एकंदर निरूपण या अध्या यांत पुरे केले आहे. तसेच नव्या अध्यायांतील भक्तिमार्गाचे सुद्धा अनेक भेद का होतात, याचे कारणहि या अध्यायांतील उपपत्तीने समजून येते (९.२३,२४ पहा). अर्जुन प्रथमतः असे विचारतो की-