पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/३२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३०६ श्रीमद्भगवद्गीता. त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः । कामः क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्त्रयं त्यजेत् ॥ २१ ॥ एतैर्विमुक्तः कौतेय तमोद्वारैत्रिभिर्नरः । आचरत्यात्मनः श्रेयस्ततो याति परां गतिम् ॥ २२ ॥ $ यः शास्त्रविधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः। न स सिद्धिमवाप्नोति न सुखं न परां गतिम् ॥ २३ ॥ तस्माच्छास्त्रं प्रमाणं ते कार्याकार्यव्यवस्थितौ । ज्ञात्या शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुमिहार्हसि ॥ २४ ॥ इति श्रीमद्भगवळीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे दैवासुरसंपद्विभागयोगो नाम षोडशोऽध्यायः॥ १६ ॥ (२१) काम, क्रोध व लोभ असे तीन प्रकारचें नरकाचे द्वार असून ते आपला नाश करणारे आहे. म्हणून या तिहींचाहि त्याग करावा. (२२) हे कौतया ! या तीन तमोद्वारांतन सुटला म्हणजे मनुष्य आपले ज्यांत कल्याण तेच आचरण करू लागतो, व नंतर उत्तम गतीला पोचतो. तीन नरकाची द्वारे सुटली म्हणजे सद्दति मिळाली पाहिजे, हे उघड आहे पण ती कोणत्या प्रकारच्या आचरणाने सुटतात ते सांगि- तलें नाहीं. करितां त्याचा मार्ग काय तो आता सांगतात-] (२३) जो शास्त्रोक्त विधि सोडून मनास वाटेल ते करूं लागला, त्याला सिद्धि मिळत नाही, आणि उत्तम गतिहि नाही (२४) तस्मात् कार्याकार्यव्यवस्थितीचा म्हणजे कर्तव्य कोणते व अकर्तव्य कोणते याचा निर्णय करण्यास तुला शास्त्र प्रमाण मानिले पाहिजे; व शास्त्रांत काय सांगितले आहे ते समजून घेऊन त्याप्रमाणे या लोकीं कर्म करणे तुला योग्य होय.