पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/३१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय १६. ३०१ प्रवत्तिं च निवृत्तिं च जना न विदुरासुराः।। न शौचं नापि चाचारो न सत्यं तेषु विद्यते ॥ ७॥ असत्यमप्रतिष्ठं ते जगदाहुरनीश्वरम् । अपरस्परसंभृतं किमन्यत्कामहैतुकम् ॥ ८॥ (७) प्रवृत्ति म्हणजे काय करावे, आणि निवृत्ति म्हणजे काय करू नये, हे आसुर लोकांस कळत नसते; आणि शुचिर्भूतपणा, किंवा आचार अगर सत्य ही त्यांचे ठायीं वसत नसतात. (८) हे (आसुरी लोक) सर्व जग असत्य, अ-प्रतिष्ट म्हणजे निराधार, अनीश्वर म्हणजे परमेश्वरावांचन असणारें, अ-परस्परसंभूत म्हणजे एकमेकांपासूनहि न झालेले, (अतएव) कामाखेरीज म्हणजे मनुष्याच्या विषयोपभोगाखेरीज त्याचा दुसरा हेतु काय असणार, असे म्हणतात, । [या श्लोकाचा अर्थ जरी स्पष्ट आहे तरी त्यांतील पदांचा अर्थ लाव. 'पयांत बराच मतभेद आहे. आमच्या मते वेदान्त किंवा कापिल सांख्य या दोन्ही शास्त्रांचे जगाच्या रचनेबद्दलचे सिद्धान्त नाकबूल करणाच्या चार्वाकादि नास्तिकांच्या मतांचे हे वर्णन आहे, व म्हणून या श्लोकां. तील पदें सांख्य च अध्यात्मशास्त्रांतील सिद्धान्ताच्या विरुद्ध अर्थाची आहेत. वेदान्ती जग विनाशी मानून त्योतलें अविनाशी सत्य-सत्यस्य सत्यं (व. २.३.६)--शोधून काढत असतो, आणि तेच सत्य तत्व जगाचा मूल आधार किंवा प्रतिष्ठा आहे असे मानितो-ब्रह्मपुच्छं प्रतिष्ठा (ते. २. ५) पण आसुरी लोक हे जग अ-सत्य म्हणजे ज्यांत सत्य नाही, आणि मग अर्थातच अ-प्रतिष्ठ म्हणजे ज्याला प्रतिष्ठा अगर आधारहि नाहीं असें मानितात. पण अध्यात्मशास्त्रांत प्रतिपादिलेले अध्यक्त परब्रह्म जरी याप्रमाणे आसुरी लोकांस संमत नसले, तरी भक्ति- मार्गातील व्यक्त ईश्वर स्यास मान्य असेल अशी शंका येण्याचा संभव आहे. म्हणून अनीश्वर (अन्+ईश्वर) हे तिसरे पद घालून आसुरी