पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/३१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. $ दैवी संपद्विमोक्षाय निबंधायासुरी मता। ___ मा शुचः संपदं दैवीमभिजातोऽसि पांडव ।। ५।। 8 द्वौ भूतसौ लोकेऽस्मिन्दैव आसुर एव च । दैवो विस्तरशः प्रोक्त आसुरं पार्थ मे शृणु ॥ ६ ॥ 'अज्ञान' है आसुरी संपत्तीचे लक्षण असें या श्लोकांत म्हटले असल्या. मुळे 'ज्ञान' हे दैवी संपत्तीचे लक्षण आहे हे उघड होते. जगांत आढळून येणाऱ्या , दोन तव्हेच्या स्वभावाचे याप्रमाणे वर्णन झाल्यावर-] (५) (यापैकी) देवी संपत्ती (परिणामी) मोक्षदायक आणि आसुरी बंधदायक असे समजतात. हे पांडवा ! तूं देवी संपत्तीत जन्मलेला आहेस. शोक करू नको, या दोन प्रकारच्या पुरुषांत कोणती गति मिळत्ये ते संक्षेपाने सांगितले. आता आसुरी पुरुषांचे विस्ताराने दर्णन करितात-] (६) या लोकांत दोन प्रकारचे प्राणी उत्पन्न होत असतात; ( एक) देव आणि दुसरा आसुर. (पैकी) दैव (प्रकाराचे) वर्णन विस्ताराने सांगितले. ( आता ) हे पार्था ! आसुर ( प्रकाराचे ) वर्णन मी सांगतों ऐक. पूर्वीच्या अध्ययांतून कर्मयोग्याने कसे वागावे आणि ब्राह्मी अवस्था कशी असते, अगर स्थितप्रज्ञ, भगवद्भक्त व त्रिगुणातीत कोणाला म्हणतात, व ज्ञान म्हणजे काय, इत्यादिकांचे, आणि या अध्यायाच्या पहिल्या तीन श्लोकांत दैवी संपत्तिचे जे वर्णन आहे तेच दैव प्रकृतीच्या पुरुषाचे वर्णन असल्यामुळे, देव वर्गाचे वर्णन विस्ताराने पूर्वी सांगि- तले असे म्हटले आहे. आसुर संपत्तींचा थोडा उल्लेख नवव्या अध्यायांत (१.११ व १२). आला आहे. पण तेथील वर्णन अपुरे असल्यामुळे तेच आतां या अध्यायांत पुरें करितात.