पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/३१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय १६. २९९ दंभो दोऽतिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च । अज्ञानं चाभिजातस्य पार्थ संपदमासुरीम् ॥ ४ ॥ स्तर वर्णन आहे. पैकी दमांतच क्षमा, ति, अहिंसा, सत्य, आर्जव, लज्जा इत्यादी पंचवीस तीस गुणांचा व्यापकार्थी समावेश केला असून(शां.१६०) सत्याच्या निरूपणांत ( शां. १६२) सत्य, समता, दम, अमालय, क्षमा, लाज, तितिक्षा, अनसूयता, याम, ध्यान, आर्यता (लोककल्याणेच्छा) धृति, व दया या तेरा गुणांचा एका 'सत्यांतच समावेश होतो, असे म्हटले आहे; व तेथेंच या शब्दांच्या व्याख्याहि दिल्या आहेत. एका गुणांतच अशा रीतीने अनेकांचा समावेश करणे हे पांडि- त्याचे काम होय; व प्रत्येक गुणाची अशी चर्चा करूं लागल्यास दर- एक गुणावर एकेक ग्रंथ लिहावा लागेल. वरील श्लोकांत या सर्व गुणांचा जो समुच्चय सांगितला आहे त्याचा हेनु एवढाच आहे की, देवी संपत्तीच्या सात्विक रूपाची स्याने पूर्ण कल्पना यावी; आणि कांही अर्थ एका शब्दांत सुटला असला तर त्याचा समावेश दुसया शब्दांत व्हावा. अतो, वरील यादीतील 'ज्ञानयोगव्यवस्थिति' या श- ब्दाचा अर्थ आम्ही गीता ४.४१ व ४२ या श्लोकांच्या आधारे कर्मयोग- पर केला आहे. त्याग व धृति यांच्या व्याख्या खुद्द भगवानांनीच अठराव्या अध्यायांत केलेल्या आहेत त्या पहा (१८,४ व २९). देवी संपत्तीत कोणत्या गुणांचा समावेश होतो ते सांगून आतां उलट पक्षी आसुरी किंवा राक्षसी संपत्तीचे वर्णन करितात-] (४) दंभ, दर्प, अतिमान तसेच हे पार्था ! क्रोध, पारुष्य म्हणजे निष्ठरपणा आणि अज्ञान, हे आसुरी म्हणजे राक्षसी संपत्तीत जन्म. लेल्यास (प्राप्त होतात). । [महाभारत शांतिपर्व अ.१६४ व १६५ यांत यांपैकी काही दोषांचे वर्णन असून अखेरीस नृशंस कोणास म्हणावे तेहि सांगितले आहे.