पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/३१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९८ श्रीमद्भगवद्गीता. दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम् ॥ १ ॥ अहिंसा सत्यमक्रोधस्त्यागः शांतिरपैशनम् । दया भूतेष्वलोलुप्त्वं मार्दवं हीरचापलम् ॥ २ ॥ तेजः क्षमा धृतिः शौचमद्रोहो नातिमानिता । भवन्ति संपदं दैवीमभिजातस्य भारत ॥ ३॥ श्रीभगवान् महणाले-(१) अभय, शुद्ध सात्त्विक वृत्ति, ज्ञानयोग- ध्यवस्थिति म्हणजे ज्ञान (माग) व (कर्म-) योग यांची तारतम्याने व्य. वस्था, दातृस्व, दम, यज्ञ, स्वाध्याय म्हणजे स्वधर्माप्रमाणे आचरण, तप, सरळपणा, (२) आहिंसा, सत्य, क्रोध नसणे, त्याग म्हणजे कर्मफलत्याग, शान्ति, अपैशून्य म्हणजे क्षुद्र दृष्टि सुटून उदारबुद्धिः अलग, सर्व भूतांचे ठायीं दया, हावरेपणा नसण, मृदुपणा, (वाईट कृत्यांची) लाज, अचापल म्हणजे रिकामे व्यापार सुटणे, (३) तेजस्विता, क्षमा, ति, शुचिर्भूत- पणा, द्रोह न करणे, अतिमान नसण, हे (गण) हे भारता ! देवी संपत्तीन जन्मलेल्या पुरुषांस प्राप्त होतात.

[देवी संपत्तीचे हे सच्चीस गुण आणि तेराव्या अध्यायांत सांगि-

तलेली ज्ञानाची लक्षणे (गी. १३.७-११) वस्तुतः एकच होत; व याच कारणामुळे पुढील श्लोकांत 'अज्ञानाचा आसुरी लक्षणांत समा- वेश केलेला आहे. सव्वीस गुणांच्या यादीतील प्रत्येक शब्दाचा अर्थ दुसन्या शब्दाच्या अर्थाहून सर्वांशी भिन्न होईल असा सांगणे शक्य नाही; व हेतूहि पण तसा नाही. उदाहरणार्थ, अहिंसेचंच कोणो कायिक, वाचिक मानसिक असे भेद करून क्रोधाने दुसन्याचे मन दुखविणे ही एक प्रकारची हिंसाच मानितात. शुचिर्भूतपणाहि याप्रमाणे विविध मानिला, म्हणजे मनाच्या शुचिर्भूतपणांत क्रोध नसणे, द्रोह नसणे, इत्यादी गुणहि येऊ शकतात. महाभारतांत शान्तिपर्वात अध्याय १६० पासून अध्याय १६३ पर्यंत अनुक्रमें दम, तप. सत्य व लोभ यांचे सवि.