पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय २. १७ अर्जुन उवाच । ६ कथं भीष्ममहं संख्ये द्रोणं च मधुसूदन। इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हावरिसूदन ॥३॥ दिला आहे तो पहा. हा संकल्प महाभारतांत नसला तरी हा गीतेवर संन्यामार्गाच्या टीका होण्यापूर्वीचा असला पाहिजे; कारण कोणीहि .संन्यासमार्गातील पंडित असा संकल्प देणार नाही. गीतेत संन्यास- मार्गाचे प्रतिपादन नसून कर्मयोगाचे शास्त्र म्हणून संवादरूपाने विवे. 'चन आहे असे यावरून उघड होते. संवादात्मक आणि शास्त्रीय पद्धति 'यांतील भेद रहस्याच्या चवदाव्या प्रकरणाच्या आरंभी सांगितला अरहे.' अध्याय दुसरा. संजय म्हणाला--(१) याप्रमाणे करुणेने व्यापिलेल्या, अश्रमी भरून डोळे दाटून आलेल्या, आणि विषाद पावणा-या अर्जुनास मधुसूदन (श्रीकृष्ण) असें भाषण करिते झाले.-श्रीभगवान् ह्मणाले-(२) हे अर्जुना ! आर्यानी म्हणजे सत्पुरुषांनी (कधीहि ) न आचरिलेले, अधोगतीला नेणारे आणि दुष्कीतिकारक असे हे काळेंबर (कश्मलं) या संकटसमयीं तुझ्या मनांत कोठून अलें ? ( ३) हे पार्था ! असा नामर्द होऊ नको ! हे तुला शोभत नाही. अरे तूं शत्रूस ताप देणारा ! अंतःकरणाचे हे क्षुद्र दुबळेपण सोडून देऊन ( युद्धास ) उभा रहा ! [ परंतप या शब्दाचा आम्ही या ठिकाणी अर्थ दिला आहे स्वरा. पण अनेक ठिकाणी येणारी विशेषणरूपी सोधने किंवा कृष्णार्जुनांची नावें गीत हेतुगर्भ किंवा साभिप्राय योजिली आहेत, असें जें बहुतेक टीकाकारांचे म्हणणे आहे, ते आमच्या मते सयुक्तिक नाही. गी. २