पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/३०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः । प्रणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम् ॥१५॥ सर्वस्य चाहं हृदि संनिविष्टो मत्तः स्मृतिनिमपोहनं च। घेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांतकृद्वेदविदेव चाहम् ॥ १५ ॥ द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च । क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते ॥ १६ ॥ उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदाहृतः । (१४) मी वैश्वानररूप अग्नि होऊन प्राण्यांच्या देहांत राहिला असून, प्राण व अपान यांनी युक्त होरसाता (भक्ष्य, चोष्य, लेह्य व पेय असें) चार प्रकारचे अन्न पचन करितो. (१५) तसेंच सर्वांच्या हृदयांत मी अधि. ष्ठित असून स्मृति, ज्ञान व अपोहन म्हणजे तन्नाश, ही माझ्यापासूनच होतात आणि सर्व वदांनी जे काय जाणावयाचे ते मीच. वेदान्ताचा कर्ता आणि वेद जाणणाराहि मी. [ या श्लोकाचा दुसरा चरण कैवल्योपनिषदांत आला असून (कै.२.३) स्यांत "वेदैश्च सवैः"याऐवजी " वेदरनेकः" एवढाच पाठभेद आहे. तेव्हां वेदान्त' हा शब्द गीताकाली प्रवृत्त झालेला नव्हता असें कल्पून हा श्लोक प्रक्षिप्त असावा किंवा त्यांत 'वेदान्त' शब्दाचा अर्थ दुसरा काही तरी घेतला पाहिजे असे जे तर्क कित्येकांनी काढिले आहेत ते निर्मूल होत. 'वेदान्त' हा शब्द मुंडक (३. २. ६ ) व श्वेताश्वतर था उपनिषदांतून आलेला असून श्वेताश्वतरांतील काही मंत्र तर शब्दशः गीतेत आलेले आहेत. आतां पुरुषोत्तमाचे लक्षण काय तें निरुक्तिपूर्वक सांगतात-] (१६) या लोकांत 'क्षर' आणि 'अक्षर' हे दोन पुरुष आहेत. क्षर म्हणजे सर्व (नाशवंत) भूते आणि कूटस्थ म्हणजे या सर्व भूतांच्या मूळाशी (कूटाशी)