पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/३०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय १५. २९६ 5 यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलम् । यञ्चंद्रमसि यच्चानौ तत्तेजो विद्धि मामकम् ॥ १२ ॥ गामाविश्य च भूतानी धारयाम्यहमोजसा। पुष्णामि चौषधीः सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः ॥१३॥ करणारे जे योगी ते आपले ठायीं स्थित असलेल्या या आत्म्यास ओळखि- तात पण ज्यांचा आत्मा म्हणजे बुद्धि संस्कृत नाही असे अज्ञ लोक प्रयत्न करूनहि याला ओळखीत नाहीत. [१० व्या ११ व्या श्लोकांत ज्ञानचक्षु किंवा कर्मयोगमार्गाने आत्मज्ञान होते असे सांगून जीवाच्या उस्कान्तीचे वर्णन पुरे केले. आतां याचे मागें सातव्या अध्यायात वर्णिल्याप्रमाणे (७.८-१२ पहा) आरम्याच्या सर्वव्यापित्वाचे प्रस्तावनेदाखल थोडे पुन्हा वर्णन करून पुढ सोळाव्या श्लोकापासुन पुरुषोत्तमस्वरूप सांगितले आहे. ] (१२) जे तेज सूर्यामध्ये असून सर्व जगाला प्रकाशित करते, जें तेज चंद्रांत आणि अग्नीत आहे ते माझेच तेज असें समज. (१३) तसेच पृथ्वीमध्ये प्रवेश करून मीच (सर्व) भूते आपल्या तेजानें धारण करितों, आणि रसात्मक सोम (चंद्र) होऊन सर्व औषधींचे म्हणजे वनस्पतींचे पोषण करितों. [सोम या शब्दाचे ' सोमवल्ली' व 'चंद्र' असे दोन्ही अर्थ आहेत; आणि चंद्र ज्याप्रमाणे जलात्मक, अंशुमान व शुभ्र आहे त्याचप्रमाणे सोमवल्लीहि असते, असें वेदांत वर्णन असून, दोहोसहि ' वनस्पतींचा राजा' असे म्हटले आहे. तथापि पूर्वापरसंदर्भावरून येथे चंद्र हाच अर्थ विवक्षित आहे. चंद्राचे तेज मीच असें या श्लोकांत सांगितल्यावर या श्लोकांतच वनस्पतींचे पोषण करण्याचा जो चंद्राचा गुण तोहि मीच असे म्हटले आहे. चंद्र जलमय असल्यामुळे हा गुण त्याचे अंगी असून त्यामुळे वनस्पतींची वाढ होते अशी इतरत्रहि वर्णने आहेत.]