पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/३०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२५२ श्रीमद्भगवद्गीता. उत्क्रामंतं स्थितं वापि भुंजान वा गुणान्वितम् । विमूढा नानुपश्यान्ति पश्यन्ति शानचक्षुषः॥ १० ॥ यतन्तो योगिनश्चैवं पश्यल्यात्मन्यवस्थितम् । यतन्तोऽयकृतात्मानो नैनं पश्यन्त्यचेतसः ॥ ११ ॥ बाहेर कसे जाते आणि त्यांत राहून विषयोपभोग कसा घेते या तीन स्थितींचे वर्णन आहे. सांख्यमताप्रमाणे हे सुक्ष्म शरीर महान् तरवा- पासुन सुक्ष्म पंचतन्मात्रांपर्यंतच्या अठरा तत्वांचे झालेले आहे; व वेदान्तसुरांत (३.१.१) पंच सुक्ष्म भूर्ते व प्राण यांचाहि त्यांत समावेश होतो असे म्हटले आहे. गीतारहस्यप्रकरण ८ पृ. १८४-१८७ पहा. तसेंच मैन्युपनिषदांत (९.१०) सुक्ष्म शरीर अठरा तस्वाचे असें वर्णन आहे. यावरून " मन व पांच इंद्रियें" या शब्दांनी सूक्ष्म शरीरात असणान्या दुसन्या तत्त्वांचा संग्रह हि येथें अभिप्रेत आहे, असे म्हणावें लागते. जीवात्मा परमेश्वरापासून दरवेळी नवा नवा उत्पन्न होत नसून परमेश्वराचा तो 'सनातन अंश" आहे (गी. २.२४ पहा), हा सिद्धान्त वेदान्तसूत्रांतहि नित्य' आणि 'अंश' या दोन पदांचा उप. योग करूनच सांगितला आहे (व.स.२.३.१७ व ४३)व गीतेतील क्षेत्रक्षत्रज्ञविचार ब्रह्मसत्रांतून घेतला आहे असे जे तेराव्या अध्यायांत म्हटले आहे (१३. ४) स्याचे याने हतीकरण होते (गी. र. परी. पृ. ५३३, ५३४ पहा). 'अंश' शब्दाचा अर्थ 'घटकाशा'दिवत् अंश समजावयाचा, तोड्न काढिलेला 'अंश' नव्हे, असें गीतारहस्थाच्या नवव्या प्रकरणांत (पृ. २४३) दाखविले आहे. शरीर धारण करणे, शरीर सोडून जाणं व उपभोग घेणे या सीन क्रिया याप्रमाणे चालल्या असतां--] (१०) शरीरातून निधून जाणारास अथवा राहाणारास किंवा गुणांनी युक्त होऊन (स्वत: नव्हे) उपभोग घेणारास मूर्ख लोक जाणीत नाहीत. ज्ञानचक्ने पहाणारे लोक (त्यास) ओळखतात. (११) तसेंच प्रयत्न - - - - - - - - - - - - - - - - -