पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/३०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२९० श्रीमद्भगवद्गीता. निर्मानमोहा जितसंगदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः। द्वंद्वैर्विमुक्ताः सुखदुःखसंझर्गच्छन्त्यमूढाः पदमव्ययं तत् ॥ ५ ॥ म तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः । यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ॥ ६॥ ष्टाची उत्पत्ति झाली त्यालाच जाऊन पोचावे" असा अर्थ करिता येईल पण 'प्रपद' हा धातु नित्य आत्मनेपदी असल्यामुळे 'प्रपद्येत्' असे त्याचे विध्यर्थी तृतीयपुरुषी रूप होऊ शकत नाही. 'प्रपद्येत्' हे पर- स्मैपदाचे रूप असून ते व्याकरणदृष्टया अशुद्ध होय. प्राय: याच कार- णास्तव हा पाठ शांकरभाष्यांत स्वीकारिला नाही; व तेच युक्त आहे. छांदोग्योपनिषदांतील काही मंत्रांत 'प्रपद्ये' या पदाचा 'इति' शिवाय अशाच प्रकारे उपयोग केलेला आहे (छा.८.१४.१). "अपये क्रिया- पद प्रथमपुरुपी असले तरी वक्त्याशी म्हणजे हा उपदेश करणाच्या श्रीकृष्णाशी त्याचा संबंध जोडिता येत नाही, हे सांगावयास नको. आतां याप्रमाणे वागल्याने काय फल मिळत ते सांगतात-- (५) मान व मोह यांनी जे विरहित, आसक्तिदोष ज्यांनी जिंकिला आहे; अध्यात्मज्ञानाचे ठिकाणी जे नेहमी स्थिर, जे निष्काम आणि सुख दुःखसंज्ञक द्वंद्वांपासून मुक्त झालेले आहेत, ते ज्ञाते पुरुष प्या अव्यय स्थानाला जाऊन पोचतात. (६) जेथे गेले असता परत येत नाहीत. (असें) तें माझें परम स्थान होय. ते ना सूर्य, ना चंद्र, ना अमिहि प्रका- शित करीत नाही. । [यांपैकी सहावा श्लोक श्वेताश्वतर (६.१४), मुंडक (२.२.१०) व कठ (५.१५) या तिन्ही उपनिषदांत आला आहे. सूर्य, चंद्र किंवा तारे हे सर्व नामरूपांच्या कोटीत येतात, आणि परब्रह्म या सर्व नाम- रूपांपलीकडचे असल्यामुळे परब्रह्माच्या तेजॉन सुर्यचंद्रादिकांस प्रकाश मिळतो, परब्रह्मास प्रकाशित करण्यास दुसन्या कोणाचीहि अपेक्षा