पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/३०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय १५. २८९ ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन्गता न निवर्तन्ति भूयः। तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रसृता पुराणी ॥ ४॥ उपलब्ध होत नाही किंवा अंत, आदि आणि आधारस्थानहि मिळत नाही. अत्यंत खोल गेलेल्या मुळ्यांचा हा अश्वस्थ (वृक्ष) अनासक्तिरूप बळकट तरवारीने तोडून टाकून, (४) नंतर ( सृष्टिक्रमाची ही ) " पुरातन प्रवृत्ति ज्यापासून निघाली त्याच आद्य पुरुषाकडे मी जातो" (अशा संकल्पाने), जेथे गेले असतां पुनः माघारे येत नाहीत, त स्थान शोधून काढावें. सृष्टीचा संसार म्हणजे नामरूपात्मक कर्म असून हे कर्म अनादि आहे, आणि त्याचा क्षय करणे म्हणजे त्यांतील आसक्तबुद्धि सोडून देणे होय; दुसऱ्या कोणत्याहि रीतीने त्याचा क्षय होणे शक्य नाही; कारण स्वरूपतः ते अनादि व अव्यय आहे; इत्यादि विवेचन गीतार हस्थाच्या दहाच्या प्रकरणांत (पृ. २०२-२८६) केले आहे ते पहा. कर्म अनादि आहे हा सिद्धान्तच तिसन्या श्लोकांत "त्याचे स्वरूप किंवा आदिअंत लागत नाहीं" या शब्दांनी व्यक्त केला आहे; व पुढे या कर्मवृक्षाचा क्षय करण्यास अनासक्ति हे एकच साधन सांगितले आहे; तसेंच उपासना करितांना जी भावना मनांत असत्ये स्याप्र. माणे पुढे फल मिळते (गी. ८.६). म्हणून वृक्षच्छेदनाची ही क्रिया चालू असतां मनांत भावना कोणती असावी याचा खुलासा चवथ्या श्लोकांत आहे. "तमेव चाद्यं पुरुष प्रपद्ये" असा जो पाठ शांकरभा- प्यांत घेतलेला आहे त्यांत वर्तमानकाळी प्रथमपुरुषी एकवचनी 'प्रपद्ये' असें क्रियापद असल्यामुळे हा अर्थ करावा लागता; व त्यांत 'इति' सारखे काही तरी पद अध्याहृत घ्यावे लागते. ही अडचण टाळण्यास रामानुजभाष्यांत नमूद केलेले "तमेव चाद्य पुरुष प्रपद्यतः प्रवृत्तिः" है पाठांतर स्वीकारिल तर "ज्या स्थानी गेले असता पुनः माघारी येत नाही हे स्थान शोधून काढावे, (व) ज्यापासून सर्व स. गी. र. १८