पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. अधर्माभिभवात्कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः । स्त्रीषु दुष्टासु वाष्र्णेय जायते वर्णसंकरः ॥४१॥ संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च । पतन्ति पितरो ह्येषां लुप्तपिंडोदकक्रियाः ॥ ४२ ॥ दोपैरेतैः कुलप्नानां वर्णसंकरकारकैः। उत्साद्यन्ते जातिधर्माः कुलधर्माश्च शाश्वताः ॥ ४३ ॥ उत्सन्नकुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन । कितपत लागू पडतात किंवा कराव्या हाहि एक वरच्याप्रमाणेच महत्वाचा प्रश्न आहे, व त्याचे गीतेप्रमाणे उत्तर काय हे आह्मीं गीतारहस्याच्या बाराव्या प्रकरणांत (पृ. ३९०-३९५) निरूपिले आहे. गीतेच्या पुढील अध्यार्यातून जे विवेचन आहे ते पहिल्या अध्यायांत अर्जुनास आलेल्या शंकांची निवृत्ति करण्यासाठी आहे हे लक्षात ठेविलें म्हणजे गीतेचे सात्पर्य काय याबद्दल शंका रहात नाही. भारती युद्धांत एकच राष्ट्रातील व धर्मातील लोकां मध्ये दुफळी होऊन ते परस्परवधार्थ उद्यक्त झालेले असल्यामुळे या शंका उद्भवल्या असून, अर्वाचीन इति- हासांत असे प्रसंग जेथे जेथे आले तेथे तेथें हेच प्रश्न उपस्थित झालेले आहेत. असो; कुलक्षयापासून पुढे काय काय अनर्थ होतात हे अर्जुन आतां स्पष्ट करून सांगतो.] (४०) कुलक्षय झाला म्हणजे सनातन कुलधर्म नष्ट होतात, आणि (कुल) धर्म सुटले म्हणजे सर्व कुलावर अधर्माचा पगडा बसतो; (४१) अधर्म माजला म्हणजे हे कृष्णः । कुलस्त्रिया बिघडतात; बिघडल्या म्हणजे हे वाणे या ! वर्णसंकर होतो. (४२) आणि वर्णसंकर झाला म्हणजे तो कुलघातक आणि (सर्व) कुल यांना निश्चर्येकरून नरकाला नेतो, व पिंडदानतर्पणादि क्रिया लुप्त झाल्यामुळे त्यांचे पितरहि पतन पावतात. (४३) कुलघातकांच्या या वर्णसंकरकारक दोघांनी पुरातन ज्ञातिधर्म व