पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय १५. २८५ अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः। रूप भव्य वृक्ष निघालेला आहे ही कल्पना किंवा रूपक वैदिक धमी. तच नव्हे तर इतर प्राचीन धर्मातहि आढळून येते; व प्राचीन युरोपीय भाषांतुन त्यास विश्ववृक्ष ' किंवा 'जगद्वक्ष' अशी नावे आहेत. ऋग्वेदांत (१.२४.७) वरुणाच्या लोकीं एक वृक्ष असन स्या वृक्षाच्या किरणांचे मूळ वर (ऊर्व) असून त्याचे किरण वरून खाली (निचीनाः) पसरतात असे वर्णन आहे; आणि विष्णुसहस्त्रनामांत " वरुणो वृक्षः " (वरुणाचा वृक्ष) परमेश्वराच्या हजार नौवांतलेच एक नांद म्हणून सांगितले आहे. यम आणि पितर ज्या " सुपलाश बृक्षा" खाली बसून सहपान करितात (ऋ. १०. १३५.१), किंवा ज्याच्या " अग्र. भागी स्वादु पिप्पल असून ज्यावर दोन सुपर्ण पक्षी रहातात" ऋ.१. १६४. २२), अगर " ज्या पिप्पलाला (पिंपळाला ) आयु देवता (मरु. दूण) हालवितात" (२.५, ५४. १२) तो वृक्षहि हाच असून अथर्व- वेदांत 'देवसदन अश्वत्थवृक्ष तिसन्या स्वर्गलोकांत (वरुणलोकांत ) आहे" असें जें वर्णन आहे (अथर्व. ५.४.३ व १९.३९.६) तेहि याच वृक्षास अनुलक्षून आहेसे दिसते. अग्नि किंवा यज्ञप्रजापति पितृ. याणकाली देवलोकांतून नष्ट होऊन या वृक्षांत अश्वाचे (घोड्याचे) रूप धारण करून एक वर्षे गुप्त राहिला म्हणून या वृक्षास अश्वस्थ हे नांव पडले अशी तैत्तिरीय (३. ८. १२.२) ब्राह्मणांत अश्वत्थ या शब्दाची व्युत्पत्ति दिली आहे (म. भा. अनु. ८५ पहा); कित्येक नैरुक्तिकांचे असेंहि मत आहे की पितृयाणातील दीर्घ रात्रींत सूर्याचे घोडे यमलोकी या झाडाखाली विश्रान्ति घेतात म्हणून यास अश्वस्थ (म्हणजे घोड्याचे ठाणे) हे नाव प्राप्त झाले असावें. 'अ' म्हणजे नाही, 'व' म्हणजे उद्या आणि स्थ' म्हणने टिकणारा, ही आध्यात्मिक निरुक्ति मागाहन कल्पिलेली आहे. नामरूपास्मक मायेचे स्वरूप विनाशी किंवा दर घडीस