पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८४ श्रीमद्भगवद्गीता. छंदांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् ॥ १॥ ब्राह्मी स्थिति म्हणजे काय व ती कशी संपादन करावी याचें विवेचन केले. हे सर्व निरूपण सांख्यांचे परिभाषेत आहे खरें, तथापि सांख्यांचे द्वैत न परकरितां, प्रकृति व पुरुष ज्या एकाच परमेश्व- राच्या विभूति स्या परमेश्वराचे ज्ञानविज्ञान या दृष्टीने ते केलेले आहे. परमेश्वररूपाच्या या वर्णनाखेरीज अधियज्ञ, अभ्यास, अधिदैवत इ. भेद आठव्या अध्यायांत दाखवून, सर्व ठिकाणी एकच परमारमा भरला आहे, व क्षेत्रांत क्षेत्रज्ञाहतोच आहे हे पूर्वीच सांगितले आहे. आतां परमेश्वरानेच निर्माण केलेल्या सृष्टीच्या पसायाचे किंवा परमेश्वराच्या नामरूपात्मक विस्ताराचेच कधी कधी वृक्षरूपाने किंवा वनरूपाने जे वर्णन येते त्यांतील बीज काय हैं प्रथम सांगन नंतर परमेश्वराच्या सर्व स्वरूपांत श्रेष्ट असें जें पुरुषोत्तमस्वरूप त्याचे या अध्यायांत वर्णन केले आहे.] श्रीभगवान् म्हणाले-(१) मूळ (एक) वर, व शाखा (अनेक) खाली असून (जो) अव्यय म्हणजे कधीहि नाश न पावणारा छंदांसि म्हणजे वेद ही ज्याची पाने, असें ज्या अश्वत्थवृक्षाचे वर्णन करितात, तो (वृक्ष) ज्याने जाणिला तो पुरुष (खरा) वेदवेत्ता होय). [वरील वर्णन ब्रह्मवृक्षाचे म्ह. संसारवृक्षाचे आहे, संसार किंवा प्रपंच याचा अर्थ " बायकामुलांत राहून नित्य व्यवहार करणे " असा मराटीत समजतात. परंतु प्रकृतस्थली हा संकुचित अर्थ विवक्षित नसून संसार म्हणजे " डोळ्यांपुढे दिसणारे सर्व जग किंवा दृश्य सृष्टी " असा अर्थ आहे. यासच सांख्य, प्रकृतीचा विस्तार" वेदान्तो भगवं. ताच्या मायेचा पसारा" असे म्हणतात, व अनुगीतेत यासच 'ब्रह्मा- वृक्ष व ब्राह्मवन' (ब्रह्मारण्य) असे म्हटले आहे (म. भा. अश्व. ३५ व ४७ पहा). एक सूक्ष्म बीजापासून ज्याप्रमाणे मोठा गगनचुंबित वृक्ष निर्माण व्हावा त्याप्रमाणे एका अव्यक्त परमेश्वरापासून दृश्य सृष्टि