पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२७८ श्रीमद्भगवद्गीता. 55 यदा सत्त्वे प्रवृद्धे तु प्रलयं याति देहभृत् । तदोत्तमविदां लोकानमलान्प्रतिपद्यते ।। १४ ॥ रजसि प्रलयं गत्वा कर्मसंगिषु जायते । तथा प्रलीनस्तमसि मूढयोनिषु जायते ॥ १५ ॥ कर्मणः सुकृतस्याहुः सात्त्विकं निर्मलं फलम् । रजसस्तु फलं दुःखमज्ञानं तमसः फलम् ॥ १६ ॥ सत्त्वात्संजायते ज्ञानं रजसो लोभ एव च। प्रमादमोही तमसो भवतोऽझानमेव च ।। १७ ।। ऊर्व गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः । जघन्यगुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः ॥ १८ ॥ तमोगुण वाढला म्हणजे अंधार, काही करूं नये असे वाटणे, प्रमाद म्हणजे कर्तव्याचा विसर आणि मोह हे देखील उत्पन्न होत असतात. मनुष्य जिवंत असतां त्रिगुणामुळे त्याच्या स्वभावात कोणकोणते फरक होतात ते सांगितले. आतां या तीन प्रकारच्या मनुष्यांस कोणती गति मिळत्ये ते सांगतात- (१५) सत्त्वगुणाचा उत्कर्ष झाला असतां प्राणी मरण पावला तर उत्तम तत्वं जाणणारांचे म्हणजे देवादिकांचे निर्मल (स्वगोदि) लोक त्याला प्राप्त होतात. (१५) रजोगणाचे प्राबल्य अप्सतां मरण पावला तर कर्मात आसक्त झालेल्यांत (जनांत) जन्म घेतो; आणि तमोगुणांत मेला तर (पशुपक्ष्यादि) मूढ योनीत जन्मतो. (१६) पुण्य कर्माचे फल निर्मल व सात्त्विक, पण राजस कर्माचे फल दुःख, आणि तामस कर्माचे फल अज्ञान होय, असे आहे. (१४) सत्त्वापासून ज्ञान, तर रजोगुणापासून केवळ लोभ उत्पन्न होतो. तमोगणापासून प्रमाद व मोहच नव्हे तर अज्ञानहि उत्पल होते. (१८)सात्विक पुरुष वरच्या झणजे स्वर्गादि लोकांस जातात.