पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता. भाषान्तर व टीपा-अध्याय १३. २॥ क्षेत्रक्षेत्रासंयोगात्तद्विद्धि भरतर्षभ ॥ २६ ॥ समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरम् । विनश्यत्स्वविनश्यन्तं यः पश्यति स पश्यति ॥ २७ ॥ समं पश्यन् हि सर्वत्र समवस्थितमीश्वरम् । न हिनस्त्यात्मनात्मानं ततो याति परां गतिम् ॥ २८ ॥ भाक्ति करणे (गी. ४ ३९), असे आत्मज्ञानाचे निरनिराळे मार्ग या दोन श्लोकांत सांगितले आहेत. कोणत्याहि मार्गाने गेले तरी अखेर भगवंताचे ज्ञान होऊन मोक्ष मिळतो. तथापि लोकसंग्रहदष्टया कर्मयोग श्रेष्ठ असा जो पूर्वी सिद्धांत केला आहे तो यामुळे बाधित होत नाही. याप्रमाणे साधनें सांगून झाल्यावर एकंदर विषयाचा सामान्यरीता पढील लोकांत उपसंहार केला असन त्यांतहि कापिल सांख्याची वेदान्ताशी जोड घातलेली आहे.] (२६) हे भरतश्रेष्ठा ! स्थावर किंवा जंगम जो कोणीहि वस्तु निर्माण होत्ये, ती क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्या संयोगापासून होत्ये हे ध्यानात ठेव (२७) सर्व भूतांचे ठायीं सारखाच राहणारा, व सर्व भूर्ते नाहीशी झाली तरी ज्याचा नाश होत नाही, अशा परमेश्वराला ज्याने पाहिले त्याने (खरे तत्व) ओळखिलें म्हणावयाचें. (२८) ईश्वर सर्वत्र सारखाच भरलेला आहे हे जाणून (जो पुरुष) आपण आपलाच घात करीत नाही, म्हणजे आपण होऊनच चांगल्या मार्गाला लागतो, तो त्यामुळे उत्तम गतीस पोचतो. [२७ व्या श्लोकांत सांगितलेले परमेश्वराचे लक्षण मागे गी. ८-२० यांत आलेले असून त्याचा खुलासा गीतारहस्थाच्या नवव्या प्रकरणांत केलेला आहे, (गीतार. २१५ व २६५ पहा) तसेच आस्मा हा आ- पला बंधु व तोच आपला शन असे जे मागे (गी. ६.५-७) सांगि- तले तोच अर्थ २८ व्या श्लोकांत पुनः आला आहे. २६, २७ व २८ या श्लोकांत सर्व भूतांचे ठायीं साम्य बुद्धिरूप भावाचे याप्रमाणे वर्णन झाल्यावर हे जाणिल्पाने काय होते ते सांगतात-