पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२७० श्रीमद्भगवद्गीता. ६ ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मना। अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेण चापरे ॥ २४ ॥ अन्ये त्येवमजानन्तः श्रुत्वानेभ्य उपासते। तेऽपि चातितरन्त्येव मृत्युं श्रुतिपरायणाः ॥ २५ ॥ $$ यावत्संजायते किंचित्सत्त्वं स्थावरजंगमम् । कित्येक ग्रंथकारांची समजूत असून पुष्कळ वेदान्ती सांख्य उप- पत्ति सर्वथा त्याज्य मानितात. पण गीतेत तसे न करिता क्षेत्रक्षेत्रज्ञ. विचार हा एकच विषय एकदा वेदान्तदृष्ट्या, व एकदां (वेदान्ताचे अद्वैत ) सांख्यदृष्टया, प्रतिपादन केला आहे, यावरून गीता- शास्त्राची समबुद्धि व्यक्त होते. किंबहुना उपनिपदांतील आणि गीतें- तील विवेचनांतला हा एक महत्वाचा भेद होय असें म्हटले तरी चालेल (गी. र. परिशिष्ट पृ. ५३३ पहा). सांख्यांचा द्वैतवाद गीतेस मान्य नसला तरी सांळ्यांच्या प्रतिपादनांत में कांही सयुक्तिक दिसेल तें गीतस अमान्य नाही हे यावरून दिसून येते. क्षेत्रक्षेत्रज्ञाचे ज्ञान म्हणजेच परमेश्वराचे ज्ञान होय हे दुस-याच श्लोकांत सांगितले आहे. आतां पिंडाचे आणि देहांतील परमेश्वराचे हे ज्ञान संपादन करून मोक्ष मिळविण्याचे मार्ग कोणते हे प्रसंगानुसार थोडक्यात सांगतात--] (२४) काही लोक आपण होऊनच आपल्या ठायीं ध्यानाने आत्म्याला पहातात; काही सांख्ययोगाने आणि काही कर्मयोगाने, (२५) परंतु ज्यानां याप्रमाणे (स्वतः) ज्ञान होत नाही असे कित्येक दुसन्यांचे सांगणे ऐकून (श्रद्धने परमेश्वराचें) भजन करितात. ऐकिलेली गोष्ट प्रमाण मानून वागणारे हे पुरुषहि मृत्यु तरून पलीकडे जातात. । पातंजलयोगाप्रमाणे ध्यान, सांख्यमार्गाप्रमाणे ज्ञानोत्तर कम- संन्यास, कर्मयोगाप्रमाणे निष्काम बुद्धीने परमेश्वरार्पणपूर्वक कर्मे करणे आणि ज्ञान नसले तरी श्रद्धेने आप्रवचनावर विश्वास ठेवून परमेश्वराची