पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय १३. २६७ - - - - - - - - - - - - - - - मद्भक्त एतद्विज्ञाय मद्भावायोपपद्यते ॥ १८ ॥ (१८) याप्रमाणे क्षेत्र, तसेंच ज्ञान व य झणजे काय हे सक्षेपाने सांगितले. हे जाणिले झणजे माझा भक्त माझ्या स्वरूपाला येऊन पोचतो. अध्यात्म किंवा वेदान्तशास्त्राच्या आधारे आतापर्यंत क्षेत्र ज्ञान व ज्ञेय यांचा विचार केला, पैकी 'ज्ञेय' ह्मणजेच क्षेत्रज्ञ किंवा परब्रह्म आणि 'ज्ञान' दुसन्या श्लोकांत सांगितलेले क्षेत्रक्षेज्ञज्ञान, असा अर्थ असल्यामुळे पर- मेश्वराच्या सर्व ज्ञानाचे हे थोडक्यांत निरूपण होते. आणि ज्या अर्थी क्षेत्रक्षेत्रज्ञ विचार म्हणजेच परमेश्वराचे ज्ञान होय त्या अर्थी त्याचे फलाह मोक्षच असले पाहिजे हे पुढे ओघानेच प्राप्त होते; व तोच सिद्धान्त १८ व्या श्लोकांत सांगितला आहे. वेदान्तशास्त्रांतील क्षेत्रक्षे- प्रज्ञविचार येथे संपला. पण प्रकृतीपासूनच पांचभौतिक सविकार क्षेत्र उत्पन्न झाले असल्यामुळे, आणि सांख्य ज्याला 'पुरुष' म्हणतात त्याला अध्यात्मशास्त्रांत 'आत्मा' हे नांव असल्यामुळे, क्षेत्रक्षेत्रज्ञ- विचार म्हणजेच सांख्यदृष्टया प्रकृतिपुरुषविवेक होतो. सांख्यांप्रमाणे प्रकृति व पुरुष ही दोन तत्वे गीताशास्त्र स्वतंत्र मानीत नसून एकाच परमेश्वराची ही कनिष्ठ व श्रेष्ठ दोन रूप आहेत असें सातव्या अध्या. यांत सांगितले आहे (७.४,५), परंतु सांख्यांच्या द्वैताऐवजी गीताशा. खांतले हैं अद्वैत एकदां पत्करिल्यावर, मग प्रकृति व पुरुष यांच्या परस्परसंबंधाचे सांख्यांचे ज्ञान गीतेस अमान्य नाही. किंबहुना क्षेत्र- क्षेत्रज्ञ ज्ञानाचेंच प्रकृत्तिपुरुषविवेक हे रूपान्तर होते, असे म्हटले तरी चालेल (गीतार; प्र. ७ पहा). म्हणून एवढा वेळ उपनिष- दांच्या आधारे जे क्षेत्रक्षेत्रज्ञज्ञान सांगितले तेच ज्ञान आतां सांख्यांच्या परिभाषेत, पण सांख्यांचे द्वैत न स्वीकारितां, प्रकृतिपुरुषविवेक या दुसऱ्या रूपाने सांगण्यास सुरुवात करितास- - - - - - - - - -