पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. __ इति क्षेत्र तथा ज्ञानं ज्ञेयं चोक्तं समासतः । रील टीकेंत केलेला आहे तो पहा. गीता ९.१९ यांत 'सत्' आणि 'असत् ' मीच आहे असे म्हटले असन आतां खरें ब्रह्म 'सत्' नाही आणि 'असत्'हि नाही असे विरुद्ध वर्णन केल्यासारखे वाटते. पण हा विरोध वस्तुतः खरा नाही. कारण 'व्यक्त' (क्षर ) आणि 'अव्यक्त' (अक्षर) सृष्टि ही दोन्ही परमेश्वराचीच स्वरूप असली तरी खरें परमेश्वरतत्व या दोहोंपलीकडले झणजे पूर्णपणे अज्ञेय आहे, हा सिद्धांत गीतेतच पूर्वी "भूतभृन्न च भूतस्थो" (गी. ९.५). या श्लोकांत, आणि पुनः पुढे ( १५.१६,१७) पुरुषोत्तमलक्षणांतहि स्पष्ट सांगितला आहे. असो, निर्गुण ब्रह्म कशाला ह्मणतात व ते जगांत असूनहि जगाबाहेरील कसे, किंवा ते 'विभक्त' ह्म० नानारूपात्मक दिसले तरी मूळांत अविभक्त म्ह. एकच कसे, वगरे प्रश्नांचा विचार गीतारहस्याच्या ९ व्या प्रकरणांत (पृ. २०५ पासुन पुढे) केला अस- त्यामुळे त्याची द्विरुक्ती येथे करीत नाही. सोळाव्या श्लोकांत " जणूं काय विभागून राहिल्यासारखे दिसते” हे 'विभक्तमिव' याचें भाषांतर असून हा 'इव ' शब्द अर्थी, हाणजे जगांतील नानारव भ्रांतिकारक व एकत्वच काय ते सत्य, या अर्थी उपनिषदांतुन अनेक वेळा आलेला आहे. उदाहरणार्थ 'द्वैतमिव भवति" "य इह नानेव पश्यति" इत्यादी. पहा (बृ. २.४.१४; ४.४.१२, ४.३.७). (ह्मणून नानानामरूपात्मक माया हा भ्रम व यांत अविभक्तत्वाने रहाणारे ब्रह्म तेवढेच सत्य, हा अद्वैत सिद्धांतच गीत प्रतिपाद्य आहे असे उघड दिसून येते. ' अविभक्तं विमक्तेषु' झणजे नानारवाच्या ठिकाणी एकरव पहाणे है सात्विक ज्ञानाचे लक्षण होय, असें गीता १८.२० यांत पुनः सांगितले आहे. हे सारिखक ज्ञान ह्मणजेच ब्रह्म होय, इस्यादी चर्चा गीतारहस्याच्या अध्यात्मप्रकरणांत केलेली आहे. (गीतार. प्र. ९ पू. २११, २१२ आणि प्र.६ पृ. १३० व १३१) सी पहा.]