पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. येषामर्थ कांक्षितं नो राज्यं भोगाः सुखानि च । त इमेऽवस्थिता युद्धे प्राणांस्त्यक्त्वा धनानि च ॥ ३३॥ आचार्याः पितरः पुत्रास्तथैव च पितामहाः । मातुलाः श्वशुराः पौत्राः श्यालाः संबंधिनस्तथा ॥ ३४ ॥ एतान हन्तुमिच्छामि नतोऽपि मधुसूदन । अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतोः किं नु महीकृते ॥ ३५ ॥ निहत्य धार्तराष्ट्रानः का प्रीतिः स्याजनार्दन । पापमेवाश्रयेदस्मान्त्वैतानाततायिनः ॥ ३६ ॥ तस्मानाही वयं हन्तुं धार्तराष्ट्रान्स्वबांधमान् । स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव ।। ३७ ।। कृष्णा ! विजयाची इच्छा नाही, राज्य नको, आणि सुखेहि नकोत. हे गो- विदा ! राज्य, उपभोग किंवा जीवित तरी असून आम्हाला स्या या काय उप- योग? (३३) ज्यांच्यासाठी राज्याची, उपभोगाची व सुखांची इच्छा धराव. याची, तेच हे जीवाची व संपत्तीची आशा सोडून युद्धाला उभे आहेत. (३४) आचार्य, घडील, मुलगे, ससेच आजे, मामे, सासरे नातू मेहुणे आणि संबंधी, (३५) हे (आम्हांस ) मारण्यास उठले आहेत तरीहि त्रैलोक्याच्या राज्यासाठी सुद्धा हे मधुसूदना ! मी (स्यांस) मारूं हच्छित नाही; मग पृथ्वीची गोष्ट कशाला ? (३६) जनार्दना ! या कौरवाना मारून आमचे कोणते प्रिय होणार? हे जरी आततायी त तरी यांना मारिल्याने आम्हांस पापच लागणार. (३७) म्हणून अपलेच बांधव जे कौरव स्यांना आम्हींच मारणे योग्य नव्हे. कारण, हे माधवा! स्वजनांस मारून आम्ही सुखी कसे होणार?