पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय १३. २६५ अविभक्तं च भूतेषु विभक्तमिव च स्थितम् । भूतभर्तृ च यज्ञेयं असिष्णु प्रभविष्णु च ।। १६ ॥ ज्योतिषामपि तज्ज्योतिस्तमसः परमुच्यते । शानं ज्ञेयं ज्ञानगम्यं हृदि सर्वस्य धिष्ठितम् ।। १७॥ असूनहि जवळ जाहे. (१६) ते (तत्त्वतः) अविभक्त' म्हणजे अखंड (असताहि ), सर्व भूतांत जणू काय (नानात्वाने ) विभागून राहिलेले आहे व (सर्व) भूतांना धारण करणारे, ग्रासणारे व उत्पन्न करणारेहि तेच समजले पाहिजे. (१७) त्यालाच तेजाचेहि तेज, व अंधकारापली. कडचे म्हणतात, ज्ञान में जाणावयाचे ते (ज्ञेय) ज्ञानगम्य म्हणजे ज्ञानाने (च) कळणारेहि (तेच) असून, सर्वांच्या हृदयांत तेच अधि- ष्ठित झालेले आहे. अचिंत्य व अक्षर परब्रह्म ज्याला क्षेत्रज्ञ किंवा परमात्मा असेहि म्हणतान (गी. १३.२२), त्याचे वरील वर्णन, आठध्या अध्यायांतील अक्षर ब्रह्माच्या वर्णनाममाण ( गी. ८,९.११), उपनि पदांच्या आधारे केलेले आहे. सबंध तेरावा श्लोक (श्वे. ३.१६) आणि "सर्व इंद्रि. यांच्या गुणांचा भाप्त होणारे तथापि सर्वेद्रियविरहित" हे पुढील श्लोकार्य अक्षरश: श्वेताश्वतरोपनिषदांत (श्वे. ३. १७), आणि “ दूर असूनहि जवळ" हे शब्द ईशावास्य (५) व मुंडक (३.१.७) उपनि- षदांतून आढळून येतात. तसेच " तेजाचं तेज"हे शब्द बृहदारण्य- कांतले (बृ. ४.४.१६) व " अंधकाराच्या पलीकडले" हे शब्द श्वेता. श्वतरांतले (३.८) आहेत. "जे सहि नाही व जे असहि म्हणतां येत नाही" हे वर्णन ऋग्वेदातील "नासदासीत् नो सदासीत" या प्रसिद्ध ब्रह्मपर सूक्तास (ऋ. १०.१२१) अनुलक्षून आहे. 'सत्' व' असत्या दोन शब्दांच्या अर्थाचा विचार गीतारहस्य प्र. ९ पृ. २१ व २४२ यांत सविस्तर, व पुनः गीता १.१९ या श्लोकाच-