पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय १३. २६॥ FF अमानित्वमदमित्वमहिंसा शांतिरार्जवम् । [क्षेत्र व त्यांचे विकार यांचे हे लक्षण आहे. पांचव्या श्लोकांत सां- त्यांच्या पंचर्वास तत्त्वांपैकी पुरुष सोडून बाकी चोवीस तत्वे आली आहेत. या चोवीस तस्वांतच मनाचा समावेश होत असल्यामुळे इच्छा, द्वेष इत्यादी मनोधर्म निराळे सांगण्याची जरूर नव्हती. काणादांच्या मते हे धर्म आत्म्याचे होत व मत स्वीकारल्यास या गुणांचा क्षत्रां- तच समावेश होतो की नाही ही शंका येत्ये, म्हणून क्षेत्र शब्दाची व्याख्या नि:संदिग्ध करण्यासाठी क्षेत्रांतच स्पष्टरीत्या इच्छाद्वेषादि द्वंद्वांचा येथे समावेश केला आहे व त्यांतच भयाभयादि इतर इंद्वांचाहि लक्ष- णेने समावेश होतो. सर्वांचा संघात म्हणजे समूह हा क्षेसाहन स्वतंत्र कर्ता नाही हे दाखविण्यास त्याची गणना क्षेत्रांत केली आहे. 'चतना' या शब्दाचाच कित्येकदा चैतन्य' असा अर्थ होतो. पण प्रकृत स्थली चेतना म्हणजे जड देहांत प्राणादिकांचे जे व्यापार हगोचर होतात ते, किंवा जिवंतपणाच्या चेष्टा, एवढाच अर्थ विवक्षित असून जद्धांत ही चेतना ज्यामुळे उत्पन्न होते ती चिच्छक्ति किंवा चैतन्य क्षेत्रज्ञ या रूपाने क्षेत्राइन निराळे असते, हे वर दुसऱ्या श्लोकांत सांगितले आहे. 'धृति ' या शब्दाची व्याख्या गीतेतच पुढे ( १८.३३) केलेली आहे ती पहा. सहाव्या श्लोकांतील 'समासेन' या पदाचा अर्थ " ही सर्व मिळून होणारा समुदाय " असा आहे. जास्त माहिती गीतारहस्याच्या आठव्या प्रकरणाच्या अखेर (पू. १४१ व १४२) दिली आहे ती पहा, 'क्षेत्रज्ञ' म्हणजे 'परमेश्वर' हे प्रथम सांगून नंतर 'क्षेत्र' म्हणजे काय याचा खुलासा केला. आतां ज्ञान कशाला म्हणावयाचे हे सदर ज्ञानाचे मनुष्याच्या स्वभावावर जे परिणाम घड- तात त्यांचे वर्णन करून सांगतात; व पुढे ज्ञेयाचे स्वरूप सांगितले आहे हे दोन्ही विषय दिसण्यांत निराळे दिसतात; पण वास्तविकरीत्या क्षेत्रक्षेत्रज्ञविचाराचेच दोन भाग आहेत. कारण क्षेत्र म्हणजे परमेश्वर