पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. 55 महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च । इंद्रियाणि दशैकं च पंच चेंद्रियगोचराः ॥५॥ इच्छा द्वेषः सुखं दुःखं संघातश्चेतना धृतिः। एतत्क्षेत्रं समासेन सविकारमुदाहृतम् ॥ ६ ॥ ठिकाणी परस्परविरुद्ध झाल्यासारखी दिसतात. वरील श्लोकाच्या पहिल्या चरणांत 'विविध' आणि 'पृथक' असे जे शब्ह आहेत ते उपनिषदांच्या या संकीर्णस्वरूपासच उद्देशून आहेत. उपनिष, अशा प्रकारे संकीर्ण व परस्परविरुद्ध असल्यामुळे त्यांतील सिद्धान्तांची एकवा- क्यता करण्यासाठी बादरायणाचार्यानी ब्रह्मसूत्र किंवा वेदान्तसूत्रे रचिलेली आहेत. व स्थांत उपनिषदांतील सर्व विषय घेऊन प्रत्येक विषयासंबंधाने सर्व उपनिषदांपासून एकच सिद्धान्त कसा कादितां येतो हे सप्रमाण म्हणजे कार्यकारणादि हेतु दाखवून पूर्णपणे सिद्ध केले आहे. अर्थात उपनिषदांतील रहस्य समजण्यास वेदान्तसूत्रांची नेहमी जरूर पडत्ये म्हणून या श्लोकांत दोहोंचाहि उल्लेख केलेला आहे. ब्रह्मसत्रांच्या दुसऱ्या अध्यायांतील तिसन्या पादाच्या पहिल्या १६ सूत्रांत क्षेत्राचा व नंतर त्या पायाच्या अखेरपर्यंत क्षेत्रज्ञाचा विचार केलेला आहे. ब्रहासत्रांत हा विचार आहे म्हणून त्यांस 'शारीरकसूत्रे ' म्हणजे शरीर किंवा क्षेत्र याचा विचार करणारी सूत्रे असहि म्हणतात. असो; क्षेत्रक्षेत्रज्ञ- विचार कोणी व कोठे केला आहे ते सांगितले; आतां क्षेत्र हाणजे काय ते सांगतात-- (५) (पृथिव्यादि पांच स्थूल) महाभूते, अहंकार, बुद्धि (महान् ), आणि अव्यक्त (प्रकृति), तसेच दहा (सूक्ष्म) इंद्रिये व एक (मन), आणि (पांच) इंद्रियांचे पांच (शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे सूक्ष्म) विषय, (६) इच्छा, द्वेष, सुख, दुःख, संघात, चेतना म्हणजे प्राणादिकांचा व्यक्त व्यापार, आणि धृति म्हणजे धैर्य, या (तत्वांच्या) समुदायास सविकार क्षेत्र असे म्हटले आहे.