पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय १३. २५९ SS तत्क्षेत्रं यश्च यादक च यद्विकारि यतश्च यत् । स च यो यत्प्रभावश्च तत्समासेन मे शृणु ॥ ३॥ ऋषिभिर्बहुधा गीतं छंदोभिर्विविधैः पृथक् । ब्रह्मसूत्रपदैश्चैव हेतुमद्भिर्विनिश्चितैः ॥ ४ ॥ करावे लागते; व दुसरे कित्येक माझे' (मम) या पदाचा अन्वय 'ज्ञान' या शब्दाशी न लावितां मतं' म्हणजे मानिले आहे" या शब्दाशी लावून “ यांचे जे ज्ञान ते मी ज्ञान समजतो" असा अर्थ करितात. पण हे अर्थ सरळ नव्हेत देहामध्ये वास करणारा आत्मा (अधिदेव ) मीच आहे, किंवा “पिंडी ते ब्रह्मांडी," असें आठम्या अध्यायाच्या आरंभीच वर्णन असून सातव्यांतहि 'जीव ही माझीच परा प्रकृति (७.५), असें सांगितले आहे. आणि पुढे या अध्यायांतील श्लोक २२ व ३१ यांतहि तसेच वर्णन आहे. असो; आतां क्षेत्रक्षेत्रज्ञ- विचार कोठे व कोणी केलेला आहे ते सांगतात-1 (३) क्षेत्र म्हणजे काय, ते कशाप्रकारचे आहे, त्याचे विकार को- णते, आणि (स्यांतहि) कशापासून काय होते; तसेंच तो म्हणजे क्षेत्रज्ञ कोण व त्याचा प्रभाव काय, हे मी संक्षेपाने सांगतो ऐक. (४) बहुत प्रकारे, विविध छंदांनी, पृथक पृथक् (अनेक) ऋषींनी आणि (कार्यकारण- रूप) हेतु दाखवून पूर्ण निश्चित केलेल्या ब्रह्मसूत्रांतील पदांनीहि हे म्हणजे हा विषय माइला आहे. । [या श्लोकांत ब्रह्मसूत्र शब्दाने प्रस्तुतची वेदान्तसूत्रे उद्दिष्ट आहेत है गीतारहस्याचे परिशिष्टप्रकरणांत आम्ही सविस्तर दाखविले आहे (गीतार. प्र. ५२७.५३४ पहा). उपनिषदे हा एकच ऋषीचा एक प्रथ नसून, अनेक ऋषीस भिन्न भिन्न काली किंवा स्थली ज्या अध्यात्म- विचारांचे स्फुरण झाले ते विचार परस्परसंबंध न पहातां निरनिराळ्या उपनिषदांतून वर्णिले आहेत. त्यामुळे उपनिपद संकीर्ण व कित्येक - - - - - - - - - - --